शहरं
Join us  
Trending Stories
1
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
2
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
3
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
4
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
5
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
6
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
7
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
8
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
9
संतापजनक! २ मुलांची आई पडली १७ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात, दोघंही झाले फरार; आता महिलेवर POCSO कारवाई!
10
जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा
11
"मला मावशीच्या मिठीतच शांतता मिळते"; पतीचं बोलणं मनाला लागलं, नवविवाहितेनं टोकाचं पाऊल उचललं!
12
रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द
13
श्रीसंतची दुखापत अन् RR फ्रँचायझीचा ८२ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा! विमा कंपनीची सर्वोच्च न्यायालयात धाव
14
Manoj Jarange: मनोज जरांगे आजच उपोषण सोडणार? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली...
15
Pitru Paksha 2025: गणेशोत्सवानंतर लगेचच पितृपक्ष का? ९० टक्के लोकांना माहीतच नाही खरे कारण!
16
"कुठलाही विषय असू दे, मी नेहमी धावून जातो, पण...!" जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले
17
मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! अंतिम मसुदा घेऊन सरकारचे ४ मंत्री मनोज जरांगेंच्या भेटीला
18
Viral Video : गर्लफ्रेंडचा फोन सतत लागत होता व्यस्त, संतापलेल्या बॉयफ्रेंडनं काय केलं बघाच!
19
Maratha Protest: मनोज जरांगे यांच्या पत्नी आणि मुलांचाही अन्नत्याग; मुलगी म्हणाली...
20
८ वर्षांपूर्वी गायब झालेला 'रीलस्टार' पती, सतत शोध घेत होती पत्नी! आता समोर आलं धक्कादायक सत्य

अद्रकाच्या शेतीतून मिळविला १८ लाखांचा नफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 05:00 IST

देवळी तालुक्याच्या टाकळी (चणाजी) या छोट्याशा खेड्यातील सूरज व धीरज केशव कांबळे या भावंडाची ही यशोगाथा आहे. या दोन्ही भावंडानी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. पण, नोकरीत वेळ घालविण्यापेक्षा वडिलोपार्जित असलेल्या साडेआठ एकर शेतीत राबण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देऊन प्रयोगात्मक शेती करायला सुरुवात केली. इंटरनेटच्या माध्यमातून विविध पिकांची माहिती घेत गेल्यावर्षी तीन एकरामध्ये अद्रकाची लागवड केली. 

ठळक मुद्देपारंपारिक शेतीला आधुनिकतेची जोड

आनंद इंगोलेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतीत कपाशी, सोयाबीन, तुरी यासारखे पारंपरिक पीक घेतले जाते. गेल्या दोन वर्षात अस्मानी-सुलतानी संकटाने या पिकांचा मातेरा झाला. अशातच कोरोनाच्या प्रकोपात कवडीमोल भावात शेतमाल विकावा लागल्याने  खर्चही निघाला नाही. अशाही परिस्थितीत पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत भावंडांनी तीन एकरात अद्रकाची शेती फुलविली. यातून पाच-दहा नाही तर तब्बल १८ लाखांचा निव्वळ नफा मिळवून एक आदर्श निर्माण केला आहे.देवळी तालुक्याच्या टाकळी (चणाजी) या छोट्याशा खेड्यातील सूरज व धीरज केशव कांबळे या भावंडाची ही यशोगाथा आहे. या दोन्ही भावंडानी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. पण, नोकरीत वेळ घालविण्यापेक्षा वडिलोपार्जित असलेल्या साडेआठ एकर शेतीत राबण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देऊन प्रयोगात्मक शेती करायला सुरुवात केली. इंटरनेटच्या माध्यमातून विविध पिकांची माहिती घेत गेल्यावर्षी तीन एकरामध्ये अद्रकाची लागवड केली. अद्रकाचे पीक नऊ महिन्याचे असून त्याचे संगोपण व देखभाल सुरळीत केली असता तीन एकरात त्यांना ३०७ क्विंटल उत्पादन झाले. आठ ते साडेआठ हजार रुपये क्विंटलने त्यांना भाव मिळाल्याने त्यांना सरासरी २४ लाखाचे उत्पन्न झाले. यातून बेणं, ड्रिप, खत, मजुरी आदींकरिता लागलेला सहा लाखांचा खर्च वगळता तब्बल १८ लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळाला. सूरज हा मार्केटिंग तर भाऊ धीरजसह वडील, आई आणि इतर सदस्य शेतातील जबाबदारी सांभाळतात. या दोन्ही भावंडाचा हा अभिनव प्रयोग इतरही युवा शेतकऱ्यांसाठी आता प्रेरणादायी ठरत आहे.

थेट शेतातूनच केली जातेय बेणे विक्रीअद्रकाच्या बेण्याला मोठी मागणी यायला लागली आहे. त्यामुळे यावर्षी पुन्हा सहा एकरामध्ये अद्रकाची लागवड केली आहे. कोरोनाकाळात ४०० क्विंटल बेण्याची मागणी होती. ती मागणी पूर्ण करण्यात वाहतुकीसंदर्भात अडचण निर्माण झाली. त्यावर उपाय म्हणून या दोन्ही भावंडांनी मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना जिल्ह्याच्या सीमेपर्यंत बोलावून बेण्याचा पुरवठा केला. यात दलाल, हमाल नसल्याने शेतकऱ्यांनाही थेट माल मिळाला. तसेच सर्व व्यवहार डिजिटल असल्याने नफ्यामध्येही भर पडली. परिणामी कोरोनायनातही नुकसान सहन करण्याची वेळ आली नाही, असे युवा शेतकऱ्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.

आम्ही आधुनिक शेती करण्याचा निर्णय घेत अंद्रकाची लागवड केली. भुसभुशीत जमिनीत होणारे अद्रकाचे पीक काळ्या जमिनीत घेण्याचे आव्हान उभे ठाकले होते. याकरिता आधुनिकपद्धतीने लागवड करुन पीकाचे संगोपण केले. या तीन एकरात खर्च वजा जाता १८ लाखांचा निव्वळ नफा मिळाल्याने आता तायवान पपईचा प्रयोग केला आहे. यातुनही दहा लाखांचे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. पपईला दिल्लीमध्ये जास्त दर असल्याने तेथे नेण्याचे नियोजन आहे. सूरज केशव कांबळे, युवा शेतकरी  

टॅग्स :agricultureशेती