शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

घोराड-कोलगाव रस्ता खड्ड्यात

By admin | Updated: August 18, 2016 00:44 IST

गत तीन वर्षांपूर्वी घोराड -कोलगाव रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. या मार्गावरील पुलाची यावेळी डागडुजी करण्यात आली होती.

पुलाला पडले भगदाड : अपघाताची शक्यता बळावली सेलू : गत तीन वर्षांपूर्वी घोराड -कोलगाव रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. या मार्गावरील पुलाची यावेळी डागडुजी करण्यात आली होती. मात्र आता या पुलाला भगदाड पडले असून डांबरीकरण उखडले आहे. घोराड-कोलगाव रस्त्याची पुरती वाट लागल्याने मार्गक्रमण करणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. घोराड येथून कोलगावमार्गे जुनगड, चौकी, कान्होलीबारा, नागपूर कडे जाणारा मार्ग आहे. हा रस्ता शेतकऱ्यांच्या वहिवाटीचा आहे. परिसरातील शेतकऱ्यांच्या शेती या रस्त्याला लागून आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात आले. यात कोलगाव वरुन दोन कि़मी. अंतराचे डांबरीकरण करण्यात आले; मात्र घोराड वरुन दोन कि़मी.चे डांबरीकरण व खडीकरण रखडले होते. कालांतराने या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र अल्पावधीतच रस्ता उखडला. त्यानंतर तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचा दौरा असताना या रस्त्याची सरफेसिंग व पुलाची डागडुजी करण्यात आली होती. मात्र हे काम वर्वरचे असल्याने अवघ्या काही वर्षात रस्त्याची दुरावस्था झालेली दिसते. त्यामुळे या मार्गाने जडवाहन घेऊन जाणे शक्य होत नाही. आता तर बैलगाडी नेणे कठीण झाले असून या रस्त्याची केवळ दुरुस्ती न करता नव्याने खडीकरण व मजबुतीकरण करावे, अशी मागणी आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजुला नाल्याचे बांधकाम करण्याची आवश्यकता आहे. विकास कामासाठी निधी उपलब्ध करुन देत असल्याचा गवगवा लोकप्रतिनिधी करीत असले तरी पांदण रस्ते, ग्रामीण भागातील रस्त्याची होत असलेली दैनावस्था पाहुन यावर प्रश्नचिन्ह निर्माण होते. या रस्त्याचे अच्छे दिन कधी येणार, असा प्रश्न परिसरातील नागरिक विचारतात. याबाबत कार्यवाहीची ग्रामस्थांना प्रतिक्षा आहे.(शहर प्रतिनिधी) रस्त्याचे त्वरित बांधकाम करण्याची मागणी या रस्त्यावर असलेला नाल्यावर पूल असून त्याला भगदाड पडले आहे. या पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून सळाखी उघड्या पडल्या आहे. अल्पावधीतच पुलाचे बांधकाम उखडले आहे. हे बांधकाम निकृष्ट झाल्याची ओरड ग्रामस्थातून होत आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून पावसाळ्याचे दिवस असल्याने त्या खड्यात पाणी साचते. वाहनधारकांना याचा अंदाज येत नसल्याने अपघाताचा धोका बळावला आहे.