शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
3
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
4
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
5
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
6
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
7
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
8
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
9
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
10
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
11
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
12
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
13
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
14
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
15
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
16
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
17
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
18
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
20
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं

सामान्य ज्ञान स्पर्धेचे पुरस्कार वितरण

By admin | Updated: February 7, 2016 00:15 IST

लोकमत बाल विकास मंच व सरस्वती विद्या मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने सामान्य ज्ञान स्पर्धा २३ जानेवारी रोजी यशवंत विद्यालय येथे घेण्यात आली.

बाल विकास मंचचा उपक्रम : ६०० विद्यार्थ्यांचा सहभाग वायगाव (नि.) : लोकमत बाल विकास मंच व सरस्वती विद्या मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने सामान्य ज्ञान स्पर्धा २३ जानेवारी रोजी यशवंत विद्यालय येथे घेण्यात आली. यात ६०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यातील स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर करून पुरस्कारांचे वितरण शनिवारी सकाळी ८.३० वाजता सरस्वती विद्या मंदिर येथे करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरस्वती विद्या मंदिर स्थानिक समितीचे अध्यक्ष डॉ. संजय शेंद्रे तर अतिथी म्हणून प्राथमिक मुख्याध्यापिका रूपाली बोंदरे, माध्य. मुख्याध्यापक चेतन दंडारे, जया प्रजापती, स्पर्धा आयोजक गौरव देशमुख, जि.प. शिक्षक तडस, घोडे, यशंवत विद्यालयाच्या शिक्षिका देशमुख आदी उपस्थित होते. जवाहरलाल दर्डा व मॉ सरस्वती यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. प्रास्ताविक गौरव देशमुख तर संचालन तुकाराम पोहाणे यांनी केले. यातील अ गटात १०० गुण घेणारे दोन विद्यार्थी असल्याने प्रथम श्रावणी लोंडे व तमन्ना राजपुरोहित यांना, द्वितीय सचिन पोहाणे, देवयानी पोराटे यांना तर तृतीय क्रमांक जि.प. शाळेचे दोन विद्यार्थी ओम आजनकर, अभिजीत कुंभारे यांना देण्यात आले. प्रोत्साहन पुरस्कार निकीता वंजारी, क्रीश चाफले, मनस्वी डूडूरकर, आचल कुंभारे, यश देशमुख आॅक्सफोर्ड पब्लिक स्कूल वायगाव (नि.) याला देण्यात आले. ब गटात प्रथम रूजल पाटील, द्वितीय ओम चौधरी सरस्वती विद्या मंदिर तर तृतिय पुरस्कार माधुरी तेलरांधे यशवंत विद्यालय वायगाव व वैष्णवी घोडे जि.प. शाळा वायगाव यांना देण्यात आला. क गटात प्रथम गौरव भोयर, द्वितीय यशवंत शिंदे व तृतीय तेजस घोडखांदे यांना देण्यात आले. प्रोत्साहनपर पुरस्कार तेजस थूल, कुणाल डफरे, भावेश रावेकर सरस्वती विद्या मंदिर वायगाव (नि.) यांना देण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुरस्कृत करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे आभार माध्य. मुख्याध्यापक चेतन दंडारे यांनी मानले.(वार्ताहर)