शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

सामान्य रुग्णालयात रुग्णांना बाहेरूनच विकत घ्यावी लागते औषधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 23:55 IST

जिल्हा सामान्य रुग्णालयासह राज्याच्या विविध भागातील शासकीय रुग्णालयात रुग्णांना गत सहा महिन्यांपासून औषधीची खरेदी बाहेरूनच करावी लागत आहे. राज्य सरकारच्या स्तरावरून जिल्हा सामान्य रुग्णालयांना होणारा औषधीचा पुरवठा हा काही ठराविक स्वरूपाचाच करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे राज्यस्तरावरून औषधीचाच पुरवठा : ओपीडीच्या डॉक्टरांसमोर संकट

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा सामान्य रुग्णालयासह राज्याच्या विविध भागातील शासकीय रुग्णालयात रुग्णांना गत सहा महिन्यांपासून औषधीची खरेदी बाहेरूनच करावी लागत आहे. राज्य सरकारच्या स्तरावरून जिल्हा सामान्य रुग्णालयांना होणारा औषधीचा पुरवठा हा काही ठराविक स्वरूपाचाच करण्यात येत आहे. त्यामुळे विविध आजाराच्या रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात औषधीच वितरीत केली जात नसल्याचे चित्र दिसून येत आहे.जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागातून मोठ्या प्रमाणावर रुग्ण येतात. बाह्य रुग्ण विभागात या रुग्णांची सकाळी वैद्यकीय अधिकारी तपासणी करतात. त्यांना संबंधीत आजाराचे औषध लिहून दिले जातात. बऱ्याच वेळा वातावरण बदलामुळे सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर रुग्णालयात दाखल होतात. मात्र त्या रुग्णांना देण्यासाठी लागणारी औषध रुग्णालयाच्या भांडारात उपलब्ध नाही. राज्यात आरोग्य विभागात औषध खरेदी घोटाळा झाल्यानंतर औषध खरेदीचे सर्व कामे ‘हापकीन्स’ या संस्थेच्या माध्यमातून करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. मात्र या संस्थेने सामान्य रुग्णालयाच्या गरजा लक्षात घेऊन औषध पाठविलेले नाही.स्थानिक स्तरावर जिल्हा शल्य चिकित्सकांना औषध खरेदीच्या अधिकारांना कात्री लावण्यात आली आहे. त्यामुळे बाह्य रुग्ण विभागात बसून रुग्णांना औषधी लिहून देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याला रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या रोषाला समोर जावे लागत आहे. रुग्णालयात जी औषधी मिळत नाही ते तुम्ही लिहून कशी देता अशी विचारणा रुग्ण करतात. तर काही रुग्ण खासगी डॉक्टरकडे न गेल्याने आपले पैसे वाचले त्या पैशातून ही औषधी बाहेरून खरेदी करीत असल्याचे रुग्णांच्या प्रतिक्रीयेवरून दिसून येत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सर्वच भांडारामध्ये हे चित्र असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.बालकांच्या औषधीबाबत पालकांच्या तक्रारीजिल्हा सामान्य रुग्णालयात बाह्य रूग्ण विभागात बालकांना उपचारासाठी आणण्यात येते. येथे बालकांच्या आजाराचे औषधच अत्यल्प स्वरूपात असल्याने बरेच वेळा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लिहून दिलेले औषध हे बाहेरूनच घ्यावे लागतात, असे अनेक पालकांनी सांगितले.झिरो प्रिस्क्रीप्शनचा बोजवाराशासनाने मध्यंतरी जिल्ह्यात झिरो प्रिस्क्रिप्शन योजना अंमलात आणली होती. यात रुग्णाला आवश्यक सर्वच औषधी रुग्णालयातून देण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र रुग्णालयात औषधीच उपलब्ध नसल्याने या योजनेचा जिल्ह्यात सध्या बोजवारा निघाल्याचे दिसत आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल