शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाघांच्या संरक्षणाकरिता गस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 22:41 IST

गत काही दिवसांपासून शेताला विजेचे कुंपण लावून वाघाची शिकार करण्याच्या घटना घडत आहेत.

ठळक मुद्देशेत कुपंणातील वीज प्रवाह : वनविभागासह महावितरणची संयुक्त मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गत काही दिवसांपासून शेताला विजेचे कुंपण लावून वाघाची शिकार करण्याच्या घटना घडत आहेत. यावर आळा घालण्याकरिता आणि वाघांच्या संरक्षणाकरिता महावितरणने पुढाकार घेतला आहे. महावितरण वन विभागाच्या सहकार्याने रात्रीच्या वेळी ग्रामीण भागात गस्त घालून अशा प्रकारांना आळा घालणार आहे. वर्धा आणि चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात गत दोन महिन्याच्या कालावधीत ३ वाघांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला.शेतातील कुंपणात वीज प्रवाह सोडल्याने या वाघांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले होते. शेतातील कुंपणात वीज प्रवाह सोडल्याने केवळ प्राण्यांचीच नाही तर मनुष्यांचेही जीव गेले आहे. हा प्रकार बेकायदेशीर असतानाही सुरूच आहे. वाघाशिवाय अन्य जंगलीजनावरांच्या शिकारीसाठी कधी कधी शेतातील कुंपणातवीज प्रवाह सोडल्या जातो. जंगली जनावरांची शिकार केल्यावर याचा फारसा गवगवा होत नाही.जनतेमध्ये जागृती करण्यासाठी महावितरणकडून वाघाची शिकार करणे हा दंडनीय अपराध आहे या साठी कायद्यात शिक्षेची तरतूदही केली आहे. असा संदेश लिहलेले पोस्टर्स ग्रामीण भागात लावण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. सोबतच रात्रीच्या वेळी कोणी शेतातील कुंपणात वीजप्रवाह सोडला आहे याची तपासणी महावितरण आणि वनविभागाचे पथक ग्रामीण भागात करीत आहे.नागपूर जिल्ह्यातील बडेगाव, वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुका गुरुवारी गस्त घालण्यात आली. वरोरा येथील खेमजीगावात महावितरण आणि वन विभागाच्या गस्ती पथकास एका शेतातीळ कुंपणात वीज तर जोडलेली आढळून आली; पण ती प्रवाहित नसल्याचे निदर्शनास आले. यापुढे असे प्रकार आढळून आले तर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे महावितरणकडून कळविण्यात आले आहे.पिकांच्या संरक्षणाचे शेतकऱ्यासमोर नवे संकटजंगलव्याप्त भागात रात्रीच्या सुमारास वन्य प्राण्यांच्या हैदोसाने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होते. हे नुकसान टाळण्याकरिता शेतकऱ्यांकडून हा प्रकार करणे सुरू झाले. या प्रकारामुळे जंगली श्वापदांच्या त्रासापासून शेतकऱ्यांची सुटका झाली. मात्र गत महिन्यात वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील सिंदी विहिरी येथे शेताच्या कुंपनाला असलेल्या विज प्रवाहातून ही घटना घडली. आता असा प्रकार करणाºया शेतकºयांवर दंडात्म कार्यवाही करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे.