शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
2
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
3
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
4
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
5
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
6
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
7
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
9
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
10
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
11
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
12
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
13
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
14
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
15
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
16
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
17
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
18
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
19
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

एक हजार आदिवासींना गॅस जोडणी

By admin | Updated: May 27, 2014 23:53 IST

जंगल क्षेत्रातील वनसंपदेचे संरक्षण करण्यासाठी ग्रामस्थांचा सहभाग वाढविण्यासोबतच गावांमध्ये आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी बोर अभयारण्य परिसरातील १२ गावांमधील आदिवासी समाजबांधवांना

१२ गावांचा समावेश : चार वर्षांपर्यंत मिळणार सिलिंडर

ंवर्धा : जंगल क्षेत्रातील वनसंपदेचे संरक्षण करण्यासाठी ग्रामस्थांचा सहभाग वाढविण्यासोबतच गावांमध्ये आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी बोर अभयारण्य परिसरातील १२ गावांमधील आदिवासी समाजबांधवांना एक हजार चार एलपीजी गॅस जोडीणी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

बोर अभयारण्य परिसरात असलेल्या पेंढरी, वानरविहिरा, नवरगाव, सालई, गरमसूर यासह इतर १२ गावांमध्ये ग्रामपरिसर विकास समितीची स्थापना करण्यात आली. या समितीमार्फत जंगल क्षेत्रातील वृक्षतोड थांबवून तसेच जंगलावरील अवलंबीत्व कमी करण्याच्या दृष्टीने या आवश्यक सुविधा गावातच निर्माण करण्यात येत आहे.

जंगल क्षेत्रातील गावांमध्ये दररोज जळणासाठी वापरण्यात येणार्‍या लाकडाऐवजी प्रत्येक कुटुंबांना एलपीजी गॅस कनेक्शन देवून सवलतीच्यादरात नियमितपणे गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्याचा उपक्रम मुख्य वनसंरक्षक व क्षेत्रसंचालक एम.एस.रेड्डी यांनी राबविला आहे. यामुळे या क्षेत्रातील वृक्षतोडीवर नियंत्रण आले असून, आदिवासी कुटुंबांना घरपोच सिलिंडरसुद्धा उपलब्ध होत आहे.

नवरगाव येथील गॅस कनेक्शन वितरण कार्यक्रमात मुख्य वनसरंक्षक एम.एस.रेड्डी, उपवनसंरक्षक एस.बी.भलावी, उत्तम सावंत, वनपरिक्षेत्र अधिकारी आर.पी. गायनेर, वनपाल व्ही.व्ही. शिरपूरकर यांच्या हस्ते २८ लाभार्थ्यांना गॅस जोडणी वितरण करण्यात आले आहे.

अभयारण्यालगतच्या गावांना गॅस सिलिंडर या उपक्रमांतर्गत गावपरिसर विकास समिती मार्फत पेंढरी गावात ४८ लाभार्थ्यांना गॅस कनेक्शन देण्यात आले आहे. तसेच वानरविहिरा येथे ९३, सोंडी या गावात १४१, सालईकला १0१, आमगाव ९, मोळेगाव टेका ६५, नवरगाव २८, सालई पेवठ १५४, गरमसूर ५१, गोठणगाव ८८, धानोली ११२, नवेगाव ११७ अशा १२ गावांमध्ये एक हजार चार गॅस जोडणी देण्यात आली आहे.

ज्या गावांमध्ये आरोग्य सुविधा, शैक्षणिक सुविधा आदी उपक्रमही बोर अभयारण्य प्रशासनातर्फे राबविण्यात येत आहेत. या उपक्रमामुळे गावकर्‍यांमध्ये वरसंरक्षणासाठी सहभाग वाढत असून जंगलावरील अवलंबित्व कमी होत आहे. वनसंरक्षणासाठी लोकसहभाग वाढविण्याचा उपक्रम सर्वांसाठी मार्गदर्शक आहे.(प्रतिनिधी)