शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारशाह रेल्वेस्थानकावर आंध्रातील महिला मोबाईल चोरांची टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 15:46 IST

वर्धा लोहमार्ग पोलिसांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशाह रेल्वे स्थानकावरून संशयास्पद हालचाली करणाऱ्या तीन महिलांना ताब्यात घेतले.

ठळक मुद्देअकरा भ्रमणध्वनी जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: वर्धा लोहमार्ग पोलिसांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशाह रेल्वे स्थानकावरून संशयास्पद हालचाली करणाऱ्या तीन महिलांना ताब्यात घेतले. त्याच्याकडील साहित्याची पाहणी करीत विचारपूस केली असता त्यांनी मोबाईल चोरीची कबुली पोलिसांना दिली. त्यांच्याकडून वर्धा लोहमार्ग पोलिसांनी १ लाख ६५ हजार २४० रुपये किंमतीचे एकूण ११ मोबाईल जप्त केले असून सदर तिन्ही महिला आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथील रहिवासी आहेत, हे विशेष.धावत्या रेल्वे गाडीतून मोबाईल पळविल्या जाण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी वर्धा लोहमार्ग पोलिसांनी पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या मार्गदर्शनात विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून वर्धा लोहमार्ग पोलिसांची एक चमू खात्रीदायक माहितीच्या आधारे बल्लारशाह रेल्वे स्थानकावर गस्तीवर होती. सदर चमूतील काहींना तीन महिलांवर संशय आल्याने त्यांनी दुर्गा संतोष दावरकोंडा (५५), मरीअम्मा जकरय्या पटेल (५०) व सोनी बुशीदोरा पटेल (३०) रा. विजयवाडा आंध्रप्रदेश यांना ताब्यात घेवून त्यांच्या जवळील साहित्याची पाहणी केली. त्यावेळी त्यांच्याजवळ मोठ्या प्रमाणात मोबाईल असल्याचे निदर्शनास आले. अधिक विचारपूस दरम्यान सदर तिनही महिलांनी मोबाईल चोरीच्या गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली. या महिला धावत्या रेल्वे गाडीतून व गर्दीच्या ठिकाणाहून मोबाईल लंपास करीत असल्याचे वर्धा लोहमार्ग पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी १ लाख ६५ हजार २४० रुपयांचे एकूण ११ मोबाईल जप्त केले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई नागपूर लोहमार्गचे पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या मार्गदर्शनात वर्धा लोहमार्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन वडते यांच्या निदेर्शानुसार संतोष दाबेराव, जगदीश घनोरकार, अशोक हनवते, नितीन शेंडे, नितीन लोटवार, गिरीष राऊत, दिलीप बारंगे आदींनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी