शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

गांधींच्याच कर्मभूमीत पोलिसांवर वाढतोय ‘तंटे’ सोडविण्याचा ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2021 05:00 IST

राज्यात आघाडी सरकार असेपर्यंत या समित्यांनी वर्धा जिल्ह्यात उल्लेखनिय कामगिरी केली. परंतु, राज्यात भारतीय जनता पार्टीचे फडणवीस सरकार विराजमान झाल्यावर या समित्यांना घरघर लागत गेल्याने त्या सध्या मागे पडल्या आहेत.  दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात दारूबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांना आपली अर्धी शक्ती खर्ची करावी लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : कौटुंबियांत असो वा शेजाऱ्यासोबत छोट्या-छोट्या गोष्टींवरून झालेला वाद गावातच सोडविल्या जावा या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी स्वत: पुढाकार घेत महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती हा उपक्रम हाती घेतला. त्यांनी केवळ हा उपक्रम हाती न घेता त्यांनी २००७ च्या स्वातंत्र्यदिनीच्या वर्धापन दिनी त्याचा संपूर्ण राज्यात शुभारंभही केला; पण सध्या गाव पातळीवरील याच समित्या थंड बस्त्यात असल्याने छोटे-छोटे तंटे पोलीस कचेरीची पायली चढत आहे. त्यामुळे महात्मा गांधींची कर्मभूमी असलेल्या वर्धा जिल्ह्यातील पोलिसांवर तंटे सोडविण्या ताण वाढला आहे.राज्यात आघाडी सरकार असेपर्यंत या समित्यांनी वर्धा जिल्ह्यात उल्लेखनिय कामगिरी केली. परंतु, राज्यात भारतीय जनता पार्टीचे फडणवीस सरकार विराजमान झाल्यावर या समित्यांना घरघर लागत गेल्याने त्या सध्या मागे पडल्या आहेत.  दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात दारूबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांना आपली अर्धी शक्ती खर्ची करावी लागत आहे. त्यातच आता छोटे-छोटे तंटेही पोलीस स्टेशनपर्यंत येत असल्याने गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे खरे काम असलेल्या पोलिसांवर तंटे सोडविण्याच्या कामाचा ताण वाढत आहे. उल्लेखनीय म्हणजे याबाबत दबक्या आवाजात पोलीस विभागातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांमध्ये चर्चाही होत आहे. परिणामी, किमान राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची कर्मभूमी राहिलेल्या जिल्ह्यातरी तंटामुक्त गाव समितींना पुनरूज्जीवित करण्याची गरज व्यक्त होत आहे.बक्षीसातून व्हायचा गाव विकासाच्या कामावर खर्च- सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या गावांना शासनाकडून प्राेत्साहन म्हणून १ लाख ते १० लाख रुपये पर्यंत बक्षीस दिले जायचे. ही बक्षीसाची रक्कम गाव विकासाच्या कामांवर खर्च केली जायची.

रसुलाबाद गावात तंटामुक्त गाव समिती कार्यरत आहे. ही समिती सध्या उल्लेखनियच काम करीत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावातील तंटामुक्त गाव समिती पुनरूज्जीवित झाल्यास पोलिसांवरील तंटे सोडविण्याचा ताण नक्कीच कमी होईल.- राजेश सावरकर, सचिव, सरंपच संघटना, वर्धा.

तंटामुक्त गाव समितीच्या एक प्रकारे पोलिसांचा बेस ब्रॉड करण्यासाठी फायद्याच्या ठरल्या. शिवाय त्या आहेतच. तंटामुक्त गाव समित्यांचे पुनरुज्जीवन झाल्यास गावातील तंटे गावातच सुटण्यासह त्याचा सर्वाधिक फायदा पोलिसांनाच होणार आहे.- यशवंत सोळंके, अप्पर पोलीस अधीक्षक, वर्धा.

प्रत्येक महिन्याला व्हायची बैठक- जिल्ह्यात प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये शासनाच्या १९ जुलै २००७ च्या परिपत्रकाला केंद्रस्थानी ठेवून तंटामुक्त गाव समित्यांची स्थापना करण्यात आली होती. त्यावेळी प्रत्येक महिन्याला या समितीच्या अध्यक्षांची पोलीस स्टेशन पातळीवर बैठकी व्हायच्या. परंतु, मागील काही वर्षांपासून या समित्या नावालाच असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

राष्ट्रीय उपक्रम राबविण्यात समिती गावपातळीत होत्या आघाडीवर- गावपातळीवरील या समित्या सध्या थंडबस्त्यात पडल्या असल्या तरी आघाडी सरकारच्या काळात या समित्यांनी जिल्ह्यात मतदार नोंदणी, पल्स पोलिओ लसीकरण आदी राष्ट्रीय उपक्रम गावपातळीवर राबविण्यात मोलाचीच कामगिरी बजावली. तर गावातच ७० टक्के वादांचे निराकरण होत होते. परंतु,सध्या या समित्या केवळ कागदावरच असल्याने छोटे-छोटे तंटेही पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

अन् ती ठरेल आबांना खरी श्रद्धांजली- तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या सारखा दुसरा गृहमंत्री होणेच नाही असे आजही पोलीस खात्यातील अनेक अधिकारी व कर्मचारी सहज बोलतात. येत्या १५ ऑगस्टला दिवंगत आर. आर. पाटील यांनी पुढाकार घेवून सुरू केलेल्या तंटामुक्ती गाव समिती उपक्रमाला १४ वर्ष पूर्ण होत आहेत.- किमान वर्धा जिल्ह्यात स्वातंत्र्य दिनाच्या ७४ व्या वर्धापन दिनी थंडबस्त्यात असलेल्या तंटामुक्त गाव समित्या पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रत्यक्ष कार्यवाही झाल्यास खऱ्या अर्थाने आबांना श्रद्धांजली अर्पण होईल. 

 

टॅग्स :Policeपोलिस