शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ जे.सी. कुमारप्पा यांच्या समग्र माहितीसाठी ‘गांधीकुमारप्पा’ वेबपोर्टल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 13:50 IST

गांधींजींनी सांगितलेला अंत्योदयाचा विचार प्रत्यक्षात उतरविण्यासाठी कृतीशील अर्थशास्त्राची मांडणी करणारे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ जे.सी. कुमारप्पा यांचे विचार, त्यांचे अर्थशास्त्र जगाला माहिती व्हावे म्हणून ‘गांधीकुमारप्पा’ वेबपोर्टल तयार करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे दोन पुस्तके वाचायला मिळतील मधुमख्खी अर्थशास्त्र हेच जगाला तारू शकते

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गांधींजींनी सांगितलेला अंत्योदयाचा विचार प्रत्यक्षात उतरविण्यासाठी कृतीशील अर्थशास्त्राची मांडणी करणारे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ जे.सी. कुमारप्पा यांचे विचार, त्यांचे अर्थशास्त्र जगाला माहिती व्हावे म्हणून ‘गांधीकुमारप्पा’ वेबपोर्टल तयार करण्यात आले आहे. गुरूवारी त्यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त या पोर्टलचे लोकार्पण करण्यात आले. यावर कुमारप्पा यांचे साहित्य उपलब्ध केले असून यात सध्या दोन पुस्तके वाचायला मिळतील, अशी माहिती मगनसंग्रहालय समिती अध्यक्ष डॉ. विभा गुप्ता यांनी पत्रपरिषदेत दिली.सध्या जगभर महात्मा गांधी व दे. सी. कुमारप्पा यांचे ग्रामीण भागाला महत्त्व देणारे अर्थशास्त्र पुन्हा अभ्यासले जात आहे. सध्या जग प्रगत झाले आहे; पण गरीबी, निरक्षरतेची खाई भीषण झाली आहे. प्रगतीने मानव चांगला होईल, ही अपेक्षा होती; पण उलट होत आहे. मानव आणखी हिंसक होत आहे. यामुळेच गांधीजींनी गावांकडे चला असे का म्हटले, त्यांचे अर्थशास्त्र काय होते हे युरोप व अमेरिका येथे स्कूल आॅफ इकॉनॉमीद्वारे अभ्यासले जात आहे. सध्या आपली वाटचाल रसायनांचा वापर, प्रदूषण याकडे होत आहे. यामुळे ग्लोबल वॉर्मिंगचा धोका निर्माण झाला आहे. पृथ्वीची गती कमी होत आहे. चंद्र दूर जात आहे. सूर्य अधिक तळपत आहे. यामुळे जगाला सध्या गांधी व कुमारप्पांचे अर्थशास्त्र अभ्यासावे लागत आहे. गाव ते शहर हे सूत्र सर्वप्रथम अ.भा. ग्रामोद्योग संघ वर्धाने जगाला दिले होते. याबाबतचा प्रस्ताव प्लानिंग कमीशनपूढे मांडला होता; पण सध्या शहर ते गाव, असे अर्थकारण सुरू असून हे विनाशाकडे नेणारे आहे. ही बाब लक्षात घेत गांधी, कुमारप्पांच्या अर्थशास्त्राचा अभ्यास होत आहे. नैसर्गिक शेती का, युद्ध का नको, मी शाकाहारी का व्हावे आदी प्रश्न जग विचारत आहे. या प्रश्नांच्या उत्तरांसाठी कुमारप्पा यांचे अर्थशास्त्र जगाला कळणे गरजेचे आहे. त्यांनी तीन प्रकारचे अर्थशास्त्र सांगितले होते. बंदर अर्थशास्त्रात तोडणे, विद्ध्वंस करणे; मधुमख्खी अर्थशास्त्र म्हणजे जेवढे घेतो तेवढे परत करणे व बकेट इकॉनॉमी म्हणजे जेवढे आहे तेवढे सर्व वापरणे होय. मधुमख्खी अर्थशास्त्र हेच जगाला तारू शकते, असे कुमारप्पा सांगत. जगाला खादी व गावांचे दर्शन घडवू शकेल असा भारत हा एकमेव देश आहे. यामुळे आपल्या देशाने बी इकॉनॉमी अवलंबिणे गरजेचे आहे. गांधीजींना मीठाच्या सत्याग्रहाची संकल्पना कुमारप्पा यांनी दिली होती. त्यावेळी मीठ तयार करणारे एक लाख लोक कारागृहात टाकण्यात आले होते, असेही डॉ. गुप्ता यांनी सांगितले.कुमारप्पा यांची ३० पुस्तके असून ग्रामोद्योग पत्रिका ते हिंदी व इंग्रजीतून चालवित असत. यंग इंडियामध्ये त्यांचे लेख प्रकाशित झालेत. या सर्व बाबी जगाला कळाव्या म्हणून कुमारप्पांचे वेबपोर्टल तयार केले आहे. यासाठी डॉ. गुप्ता, सचिव अजय कुमार, अ‍ॅड. अशोक अग्रवाल व आनंदकुमार यांनी श्रम घेतले, असे मनीषा पेंटे यांनी सांगितले. यावेळी मुकेश लुतडे उपस्थित होते.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी