शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

गांधी विचारच सर्वोत्तमचा दिला संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 00:33 IST

महात्मा गांधी यांचे विचार सध्याच्या विज्ञान युगात अनेकांसाठी मार्गदर्शक असून ते सर्वोत्तम असल्याचा संदेश गांधी विचार यात्रेच्या माध्यमातून देण्यात आला. काँग्रेसच्यावतीने काढण्यात आलेल्या या गांधी विचार यात्रेचे नेतृत्त्व अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी केले.

ठळक मुद्देराहुल गांधींनी केले नेतृत्त्व : काँग्रेसची ‘गांधी विचार यात्रा’

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा गांधी यांचे विचार सध्याच्या विज्ञान युगात अनेकांसाठी मार्गदर्शक असून ते सर्वोत्तम असल्याचा संदेश गांधी विचार यात्रेच्या माध्यमातून देण्यात आला. काँग्रेसच्यावतीने काढण्यात आलेल्या या गांधी विचार यात्रेचे नेतृत्त्व अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी केले.स्थानिक सिव्हील लाईन येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पूतळ्यापासून ही गांधी विचार यात्रा काढण्यात आली. या यात्रेत सहभागी होण्यासाठी मंगळवारी सकाळी १० वाजतापासूनच महात्मा गांधी पुतळा परिसरात एकत्र होण्यास सुरूवात केली होती. दुपारी २ वाजेपर्यंत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी यात्रेत सहभागी होण्यासाठी तेथे एकच गर्दी केली होती. दुपारी २.४० वाजता महात्मा गांधी पुतळा परिसरातून सुरू झालेली ही पदयात्रा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक, इतवारा चौक, मुख्य बाजारपेठ, सोशालिस्ट चौक, वंजारी चौक मार्गक्रमण करीत स्थानिक रामनगर भागातील सर्कस मैदान येथे पोहोचली. तेथे पदयात्रेचे जाहीर सभेत रुपांतरण झाले. गांधी विचार यात्रेत काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.सूतमाला अर्पण करून केले राष्ट्रपित्याला अभिवादनखा. राहुल गांधी यांचा ताफा महात्मा गांधी पुतळा परिसरात दुपारी २.४० वाजताच्या सुमारास दाखल झाला. काळ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून खाली उतरलेल्या काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी सिव्हील लाईन येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला दुपारी २.४६ वाजताच्या सुमारास सूतमाला अर्पण करून त्यांना अभिवादन केले. त्यानंतर पदयात्रेला सुरूवात झाली.पोलिसांची झाली दमछाकखा. राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वातील पदयात्रेसाठी वर्धा शहरातील गांधी पुतळा परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. हळू हळू या स्थळी गांधी संवाद यात्रेत सहभागी होण्यासाठी नागरिकांनी एकच गदी गेली. अपेक्षेपेक्षा जास्त नागरिक सदर यात्रेत सहभागी होण्यासाठी येथे एकत्र झाल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कर्तव्य बजावताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली होती.सुरक्षा कवचात निघाले राहुल गांधींचे वाहनगांधी पुतळ्याजवळ पदाधिकारी व कार्यकर्त्यांची चांगलीच गर्दी उसळली होती. यावेळी त्या गर्दीला आवरतांना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. खा.राहुल गांधी यांनी येथे येताच नागरिकांकडे धाव घेतल्याने सुरक्षा यंत्रणेची तारांबळ उडाली. पोलीस व सुरक्षा रक्षकांच्या कवचातच राहूल गांधी यांचा ताफा सभास्थळाकडे रवाना झाला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSewagramसेवाग्राम