शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्य चळवळीचा साक्षीदार ‘गांधी आश्रम’ विज्ञानयुगात देतोय ‘वृक्ष संवर्धना’चाही संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2022 05:00 IST

सेवाग्राम आश्रम परिसरात महात्मा गांधी यांनी १९३६ मध्ये पिंपळवृक्ष लावून वृक्षाचे महत्त्व नागरिकांना पटवून दिले होते. शिवाय १९ व्या शतकातील चौथ्या दशकाच्या अखेरीस  वृक्ष संवर्धनासाठी सर्वांनी पुढे यावे अशी हाकच दिली. तो वृक्ष आजही आश्रमात कायम आहे. त्यानंतर येथे अनेक दिग्गजांनी विविध प्रजातींची रोपटे लावली. ते रोपटे आजही या आश्रम परिसरात असून मागील अनेक वर्षांपासून हे झाड आश्रमात येणाऱ्यांना सावली व प्राणवायू देत आहे.

दिलीप चव्हाणलोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : जमनालाल बजाज यांच्या विनंतीनंतर १९३६  साली महात्मा गांधी वर्ध्यात आलेत. त्यांनी तत्कालीन सेगावात आश्रम करण्याचे निश्चित केले. स्वातंत्र्य चळवळीला याच आश्रमातून महात्मा गांधी यांनी दिशा दिली. त्यामुळे सेवाग्रामचा गांधी आश्रम स्वातंत्र्य चळवळीचा साक्षीदारच आहे. शिवाय आजही तो संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहेच. तर, सध्याच्या विज्ञानयुगात निवास, बापू कुटी, ‘बा’कुटी, आखरी निवास, महादेव कुटी, किशोर कुटी आदी ऐतिहासिक ठेवा असलेला सेवाग्रामचा गांधी आश्रम वृक्ष संवर्धनाचाही संदेश देत आहे.सेवाग्राम आश्रम परिसरात महात्मा गांधी यांनी १९३६ मध्ये पिंपळवृक्ष लावून वृक्षाचे महत्त्व नागरिकांना पटवून दिले होते. शिवाय १९ व्या शतकातील चौथ्या दशकाच्या अखेरीस  वृक्ष संवर्धनासाठी सर्वांनी पुढे यावे अशी हाकच दिली. तो वृक्ष आजही आश्रमात कायम आहे. त्यानंतर येथे अनेक दिग्गजांनी विविध प्रजातींची रोपटे लावली. ते रोपटे आजही या आश्रम परिसरात असून मागील अनेक वर्षांपासून हे झाड आश्रमात येणाऱ्यांना सावली व प्राणवायू देत आहे. सध्या शासन-प्रशासन स्तरावरून विविध उपक्रमांच्या माध्यमातून वृक्षलागवड व संगोपन चळवळ उभी केली जात आहे. ती काळाची गरजही आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या स्वातंत्र्य चळवळीचा साक्षीदार वृक्ष संवर्धनाचा संदेश देत असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.

सेवाग्राम आश्रम देशी वृक्षांनी नटलेलाच-    जगासाठी प्रेरणास्थान असलेल्या आणि रचनात्मक कार्याची मुहूर्तमेढ रचणारा महात्मा गांधीजींचा  आश्रम देशी वृक्षांनी नटलेला आहे. आधुनिक काळातही वृक्षारोपण, संवर्धनाचा आणि पर्यावरणाचा संदेश देण्याचे महान कार्य आजही डेरेदार वृक्ष देत असल्याचे दिसून येते. सेवाग्राम येथील गांधी आश्रमात पिंपळ, बकुळ, बेल, कडुनिंब, रक्तचंदन, आवळा आदी विविध प्रजातिंची  झाडे आहेत.

तेव्हाच वसुंधरेला परत मिळेल गतवैभव- विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वृक्षांची तोड केली जात आहे. त्यामुळे वसुंधरेला गतवैभव मिळून देणे ही काळाची गरजच आहे. येत्या पावसाळ्यात प्रत्येक व्यक्तीने एक रोपटे लावून त्याच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारल्यास वसुंधरेला तिचे गतवैभव मिळून देण्यासाठी मोठा फायदाच होणार आहे.

या दिग्गजांनी लावले गांधी आश्रमात वृक्ष

-    महात्मा गांधी : १९३६ : पिंपळ-    कस्तुरबा गांधी : १९४२ : बकुळ-    आचार्य विनोबा भावे : १९६५ : पिंपळ-    रामनाथ कोविंद : २०१९ : रक्तचंदन-    राहुल गांधी : २०१४ : बकुळ -    मनेका गांधी : २०१६ : आवळा-    इंदिरा गांधी : १९७२-    राजीव गांधी : १९८६-    सोनिया गांधी : २०१० -    डॉ. प्रणव मुखर्जी : २०१४ -    सोनिया गांधी : २०१८-    डॉ. मनमोहन सिंह : २०१८ -    राहुल गांधी : २०१८

 

टॅग्स :Sewagramसेवाग्राम