शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

वंचितांच्या उत्थानासाठी गांधी-आंबेडकरांचे योगदान महत्त्वाचे; प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 11:25 IST

शोषित, पीडित, वंचितांच्या उत्थानासाठीच दोघांनीही कार्य केले. म्हणूनच दोघांचेही योगदान महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘गांधी आंबेडकर मुक्त चिंतन’ या विषयावर बोलताना केले.

ठळक मुद्दे‘गांधी आंबेडकर मुक्त चिंतन’ वर संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : महात्मा गांधी आणि बाबासाहेबांच्या कार्याचा विचार केल्यास दोघांचेही मिशन एकच होते. त्या काळात दोघांत वाद होता, पण संवाद कधीच थांबला नाही. शोषित, पीडित, वंचितांच्या उत्थानासाठीच दोघांनीही कार्य केले. म्हणूनच दोघांचेही योगदान महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘गांधी आंबेडकर मुक्त चिंतन’ या विषयावर बोलताना केले.सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानने महात्मा गांधी यांच्या ७० व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. दक्षिणायन चळवळीच्या समास २०१८ या अभियानात सेवाग्राम ते दीक्षाभूमी अभियानाचा यावेळी प्रारंभदेखील यावेळी करण्यात आला. अध्यक्षस्थानी न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी तर प्रमुख वक्ता म्हणून अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, राजमोहन गांधी, पद्मश्री डॉ. गणेश देवी, आ. आशिष देशमुख, आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर, महाराष्ट्र भूदान मंडळाचे अध्यक्ष हरिभाऊ विरूळकर, मा.म. गडकरी, उषा गांधी व सरपंच रोशना जामलेकर उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे खादीची शाल, सूतमाळ व ग्रंथ देवून स्वागत करण्यात आले.पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, आज दलितांसह बहुजन वर्गात शक्तीसह चेतना निर्माण करण्याचे काम करावे लागेल. समाजातील कथीत ठेकेदारांच्या विरूद्ध वंचितांना उतरवावे लागेल. सज्जनाचे आंदोलन नाही म्हणून दुर्जनांची शक्ती वाढल्याचे प्रतिपादन न्या. धर्माधिकारी यांनी केले. गांधी आंबेडकरांचे आंदोलन अहिंसेवर आधारित होते. पुणे कराराच्या अनुषंगाने पुण्यात दोघांचा पुतळा उभारला पाहिजे. समाज परिवर्तनाचे प्रवासी बनून राष्ट्र निर्माणाचे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी डॉ. गणेश देवी यांनीही मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक जयवंत मठकर यांनी केले तर संचालन आणि आभार मंत्री प्रा. डॉ. श्रीराम जाधव यांनी मानले. प्रारंभी वैष्णव जन तो, हे भजन आनंद निकेतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. हे नम्रता के सागर, या प्रार्थनेन समारोप झाला. आश्रमाच्या इतिहासाची माहिती मार्गदर्शक संगिता चव्हाण यांनी दिली. स्वागत कामगार जयश्री पाटील व पांडुरंग थूल यांनी केले. बापूंना सर्वांनी उभे राहून आदरांजली वाहिली.धर्माचे राजकारण धोकादायक - राजमोहन गांधीयाप्रसंगी राजमोहन गांधी म्हणाले, धर्माचे राजकारण धोकादायक बनले आहे. १९४८ ला महात्मा गांधी तर १९५६ ला बाबासाहेब आम्हाला सोडून गेले. गांधीजींच्या हत्येपासून हत्यासत्र सुरू असल्याचे दिसते. देशाला स्वातंत्र्य मिळाले पण खऱ्या अर्थाने विचारांचे स्वातंत्र्य कुठे आहे, असा सवाल त्यांनी केला.

टॅग्स :Sewagramसेवाग्रामPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर