शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या नाकाखाली भरला जुगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 23:27 IST

येथील पोलीस मुख्यालयाच्या आवारात असलेल्या एका पोलीस क्वार्टरमध्ये जुगार सुरू असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी कार्यवाही केली. यात दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह अन्य चार जणांना अटक करण्यात आली. तर क्वार्टर मालकाला अटक होणे बाकी आहे.

ठळक मुद्देमुख्यालयातील क्वार्टरवर धाड : सात जणांना अटक; ५५,९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येथील पोलीस मुख्यालयाच्या आवारात असलेल्या एका पोलीस क्वार्टरमध्ये जुगार सुरू असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी कार्यवाही केली. यात दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह अन्य चार जणांना अटक करण्यात आली. तर क्वार्टर मालकाला अटक होणे बाकी आहे. या कारवाईत ४४ हजार ९२० रुपयांच्या रोख रकमेसह दोन मोबाईल असा एकूण ५५ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कार्यवाही शुक्रवारी करण्यात आली. पोलिसांच्या सुरक्षेत त्यांच्याच नाकाखाली भरलेल्या या जुगारामुळे दिव्याखाली अंधाराचा प्रकार वर्धेत उघड झाला.या कारवाईत सावंगी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला जमादार रविंद्र डहाके, बॉम्ब निरोधक पथकाचा कर्मचारी निलेश मैदपवार व क्वार्टरचा मालक नदीम खान याच्यासह अन्य सलीम खान पठाण, आसिफ शेख महेबुब शेख, वसीम खान, शंकर शेंडे व सोनू नामक व्यक्ती अशा आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात सात जणांना अटक करण्यात आली असून नदीम खान सध्या नागपुरात आहे.पोलीस मुख्यालय म्हणजे पोलिसांचा हृदय असे बोलले जाते. या भागात असलेली पोलिसांची गस्त आणि त्यांच्या वर्दळीमुळे येथे सर्वसामान्यांचे येणे तसे अशक्यच. याच संधीचा लाभ घेत येथील नदीम खान नामक पोलीस कर्मचाºयाचा भाऊ वसीम खान याने त्याच्या क्वार्टरमध्ये जुगार सुरू केला. हा जुगार बऱ्याच दिवसांपासून सुरू असल्याची चर्चा येथे आहे. पोलिसांच्या सुरक्षेच्या घेऱ्यात भरणाऱ्या या जुगाराची माहिती शहर पोलिसांना मिळताच त्यांच्याही पायाखालची वाळू सरकली. त्यांनी लगेच वरिष्ठांना सूचना देत या क्वार्टरवर धाड घातली. येथे भर दिवसा जुगार सुरू असल्याचे दिसून आले.पोलिसांनी या प्रकरणी कार्यवाही करीत रोख ४४ हजार रुपये आणि मोबाईल व इतर साहित्य असा एकूण ५५ हजार ९७० रुपये जप्त केला. या प्रकरणी शहर ठाण्यात जुगार कायद्याच्या कलमा ४,५, अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. ही कारवाई शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत मदणे यांच्यासह त्यांच्या कर्मचाºयांनी केली.पोलीस प्रशासनाच्या दिव्याखाली अंधारशहरात वा जिल्ह्यात सुरू असलेला जुगार, क्रिकेट सट्टा, अवैध दारू आदि प्रकारावर पोलिसांकडून धाडी घातल्या जात आहे. या धाडी घालताना पोलिसांच्या सुरक्षेच्या घेऱ्यात असलेल्या मुख्यालयाच्या आवारातच जुगार भरेल असा विचार कधी पोलिसांनीही केला नसावा. मात्र त्यांच्या याच सुरक्षा घेऱ्याचा लाभ घेत एका पोलीस कर्मचाऱ्याच्या नावे रिकामे असलेल्या क्वार्टरमध्ये या कर्मचाऱ्याच्या भावानेच जुगार भरविल्याचे समोर आले.क्वार्टरची माहिती अद्यावत नाहीजिल्हा पोलीस विभागाच्यावतीने पोलिसांना त्यांच्या वसाहतीत क्वार्टर देण्यात येते. पण सध्या या क्वार्टरपैकी कोणते क्वार्टर खाली आहे व कोणते क्वार्टर कोणाला मिळाले याची अद्यावत माहिती पोलिसांकडे नसल्याचे समोर आले आहे. त्याची चौकशी सध्या सुरू असल्याची माहिती प्रभारी गृह पोलीस अधीक्षक पराग पोटे यांनी दिली.नदीम खान नागपुरातजुगार सुरू असलेले क्वार्टर मुख्यालयाचा पोलीस कर्मचारी नदीम खान याच्या नावे आहे. तो सध्या विभागीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याकरिता नागपुरात आहे. त्याच्या गैरहजेरीत त्याच्या भावाने जुगार भरविल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.

टॅग्स :Crimeगुन्हा