शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

एसटीच्या उत्पन्नाला मालवाहतुकीचा दे धक्का!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 05:00 IST

जून ते ऑगस्ट या चार महिन्यांच्या कालावधीत वर्धा विभागाच्या रित्या झालेल्या तिजोरीत मालवाहतुकीपोटी ४२ लाख ८९ हजार ५८८ रुपयांची भर पडली आहे. या कालावधीत मालवाहतुकीकरिता एसटीच्या ८९९ फेऱ्या झाल्यात. तब्बल १ लाख १६ हजार ९७६ किलोमीटर राज्यांतर्गत मालवाहतूक करणाऱ्या एसटी धावल्या. परिवहन महामंडळाने पंधरवड्यापूर्वी पूर्ण क्षमतेने एसटीची वाहतूक सुरू केली आहे. मात्र कोरोनाचे संकट कायम असल्याने प्रवाशांचा अद्याप प्रतिसाद नाही. परिणामी, एसटीला तोटा सहन करतच वाटचाल सुरू ठेवावी लागत आहे.

ठळक मुद्देमिळाले ४३ लाखांचे उत्पन्न : चार महिन्यांत १ लाख १६ हजार ९७६ किलोमीटर धावली एसटी

सुहास घनोकारलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून लॉकडाऊन करण्यात आल्याने परिवहन महामंडळाच्या एसटीचीही चाके जागीच थांबली होती. त्यामुळे महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे वाहतूक उत्पन्न बुडाले. एसटीपासून उत्पन्न सुरू ठेवण्यासाठी एसटीतून मालवाहतूक करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला. त्यानुसार सुरुवातीला वर्धा आगाराने पाच आणि नंतर बसेस मालवाहतुकीसाठी सुरू केल्या होत्या. यातून महामंडळाच्या उत्पन्नाला बऱ्यापैकी हातभार लागला आहे.जून ते ऑगस्ट या चार महिन्यांच्या कालावधीत वर्धा विभागाच्या रित्या झालेल्या तिजोरीत मालवाहतुकीपोटी ४२ लाख ८९ हजार ५८८ रुपयांची भर पडली आहे. या कालावधीत मालवाहतुकीकरिता एसटीच्या ८९९ फेऱ्या झाल्यात. तब्बल १ लाख १६ हजार ९७६ किलोमीटर राज्यांतर्गत मालवाहतूक करणाऱ्या एसटी धावल्या. परिवहन महामंडळाने पंधरवड्यापूर्वी पूर्ण क्षमतेने एसटीची वाहतूक सुरू केली आहे. मात्र कोरोनाचे संकट कायम असल्याने प्रवाशांचा अद्याप प्रतिसाद नाही. परिणामी, एसटीला तोटा सहन करतच वाटचाल सुरू ठेवावी लागत आहे.कोरोना संक्रमणामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने एसटीही बंद ठेवण्यात आली होती. दरम्मान महामंडळाला कोट्यवधी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले. त्यामुळे महामंडळाने एसटीची मालवाहतूक सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. कोरोनाचे संकट अजून किती दिवस असणार, हे सांगता येणे अवघड असले तरी कायमस्वरूपी हे संकट राहणार आहे. पर्यायाने प्रवाशांना एसटीची गरज भासणारच आहे. महामंडळाला एसटी बंद ठेवून चालणार नाही. यामुळेच एसटी सुरू राहण्यासाठी रेल्वेप्रमाणे एसटीमधून मालवाहतूक सुरू करण्यात आली आहे. वर्धा विभागांतर्गत वर्धा, आर्वी, पुलगाव, हिंगणघाट, तळेगाव (श्या.पंत) हे पाच आगार आहेत. या पाचही आगारांतर्गत सद्यस्थितीत २० मालवाहतूक एसटी धावत आहेत. मालवाहतुकीला जिल्ह्यातील कारखानदार, व्यावसायिक आणि शेतकरी वर्गाकडून प्रतिसाद मिळत आहे. विभागाला वाढत असलेला प्रतिसाद लक्षात घेता महामंडळाने आणखी १० मालवाहतूक एसटी मंजूर केल्या आहेत.वर्धा विभागात १५०० कर्मचारीवर्धा विभागांतर्गत वर्धा, आर्वी, पुलगाव, हिंगणघाट, तळेगाव (श्या.पंत) हे पाच आगार असून १५०० च्या जवळपास कर्मचारी कार्यरत आहेत. कोरोना काळात एसटीची सेवा बंद होती. वेतनावरही परिणाम झाला होता. यामुळे या कर्मचाऱ्यांचाही जीव टांगणीला लागला होता. एसटीचा गाडा आता पूर्वपदावर येत मालवाहतुकीमुळे हातभार लागला असल्याने कर्मचारी वर्गात काही प्रमाणात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.वेतनावर २ कोटी २५ लाखांचा खर्चवर्धा विभागांतर्गत असलेल्या पाचही आगारात १५०० च्या जवळपास अधिकारी, कर्मचारी, चालक आणि वाहक कार्यरत असून या सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनावर महामंडळाकडून महिन्याकाठी २ कोटी २५ लाखांवर खर्च होतो.एसटीचे कर्मचारी दोन महिन्यांपासून वेतनाविना; आर्थिक ओढाताणकोरोना विषाण संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे एसटीची चाके जागीच थांबली होती. परिणामी, महामंडळाचे कोट्यवधींचे वाहतूक उत्पन्न बुडाले. पंधरवड्यापूर्वी एसटीची प्रवासी वाहतूक पूर्णक्षमतेने सुरू झाली. मात्र, अद्याप प्रवाशांचा प्रतिसाद अल्प असाच आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनावर परिणाम झाला असून ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांचे वेतन थकीत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची प्रचं आर्थिक ओढाताण होत आहे. वेतनाचा प्रश्नही आता सुरळीत करावा, अशी मागणी कर्मचारीवर्गातून होत आहे.

टॅग्स :state transportएसटी