शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्य हे साध्य नव्हे तर भविष्याच्या उभारणीचे साधन होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 06:00 IST

स्वांतत्र्य हे त्यांच्यासाठी साध्य नव्हते तर ते भविष्याच्या उभारणीचे साधन होते, असे मौलिक विचार ‘जवाहरलाल नेहरु: स्वांतत्र्य लढ्याचे नेते आणि देशाचे पंतप्रधान’ या पुस्तकात सामावलेले आहे. या पुस्तकाचे लेखन लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी केले असून ते पुस्तक आज सेवाग्राम येथे महात्मा गांधी यांच्या चरणी अर्पण करण्यात आले.

ठळक मुद्देसुरेश द्वादशीवार लिखित ‘जवाहरलाल नेहरु : स्वातंत्र्य लढ्याचे नेते व पंतप्रधान’ पुस्तक बापूंना अर्पण

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : जवाहरलाल नेहरु यांच्यासाठी स्वातंत्र्य हा जुन्या मार्गाचा शेवट नव्हता, नव्या वाटेचा आरंभ होता. त्या आधीचा त्यांचा व देशाचा प्रवास एका प्रदीर्घ व अंधाऱ्या वाटेवरील कष्टाचा, वेदनांचा व विजयांचा होता. स्वांतत्र्य हे त्यांच्यासाठी साध्य नव्हते तर ते भविष्याच्या उभारणीचे साधन होते, असे मौलिक विचार ‘जवाहरलाल नेहरु: स्वांतत्र्य लढ्याचे नेते आणि देशाचे पंतप्रधान’ या पुस्तकात सामावलेले आहे. या पुस्तकाचे लेखन लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी केले असून ते पुस्तक आज सेवाग्राम येथे महात्मा गांधी यांच्या चरणी अर्पण करण्यात आले.सेवाग्राम येथील महात्मा गांधी आश्रमातील बापू कुटीला संपादक सुरेश द्वादशीवार यांनी भेट दिली. त्यांनी ‘जवाहरलाल नेहरु: स्वांतत्र्य लढ्याचे नेते आणि देशाचे पंतप्रधान’ हे पुस्तक बापू कुटीतील बापुंच्या गादीवर ठेऊन ते नतमस्तक झाले. यावेळी चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा मनपा नगरसेवक नंदू नागरकर, सेवाग्राम आश्रम कार्यालयाचे प्रमुख सिद्धेश्वर उंबरकर, आनंद निकेतन विद्यालयाच्या संचालिका सुषमा शर्मा व अतुल शर्मा यांची उपस्थिती होती. द्वादशीवार यांनी आश्रम परिसराची पाहणी करुन पुस्तक विक्री केंद्रालाही भेट दिली. त्यांच्या पुस्तकाच्या शेवटच्या पानावर दिवंगत पतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या आयुष्याच्या प्रवासाचे ओझरते वर्णन करताना त्यांनी २७ वर्षे स्वातंत्र्यलढ्याच्या धकाधकित गेली. त्यापैकी १० वर्षे तुरूंगात काढली होती. डिसेंबर १९२१ मध्ये ते प्रथम तुरूंगात गेले.त्यांचा अखेरचा तुरुंगवास ९ आॅगस्ट १९४२ रोजी सुरू झाला होता. तो १ हजार ४१ दिवसांचा होता. अखेरच्या कारावासानंतर दोन वर्षांनी ते देशाचे पंतप्रधान झाले आणि १६ वर्षे त्या पदावर राहिले.त्या काळात त्यांनी देशाच्या आधुनिकतेची, लोकशाही वाटचालीची व सर्वक्षेत्रिय प्रगतीची पायाभरणी केली. अशा या नेत्याचे चरित्र समजून घेतले पाहिजे, कारण एका मर्यादित अर्थाने ते देशाचेही चरित्र आहे, असेही या पुस्तकात नमुद आहे.

टॅग्स :Jawaharlal Nehruजवाहरलाल नेहरू