शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

८ हजार ५६६ विद्यार्थ्यांना मिळाला मोफत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 06:00 IST

जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या विनाअनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित (अल्पसंख्यांक दर्जाप्राप्त शाळा वगळता) शाळांमध्ये नर्सरी व पहिलीत वंचित व दुर्बल घटकातील बालकांना २५ टक्के कोट्यांतर्गत दरवर्षी प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. यामध्ये आठही तालुक्यातील शाळांची नोंदणी झाल्यानंतर त्या शाळेत प्रवेश मिळविण्याकरिता ऑनलाईन नोंदणी करुन सोडत पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्या जातो.

ठळक मुद्देआरटीई प्रवेश प्रक्रियेचा लाभ। आठही तालुक्यांची आठ वर्षांतील परिस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रि येतून गेल्या आठ वर्षामध्ये ८ हजार ५६६ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात आला आहे. यावर्षीही ऑनलाईन अर्ज नोंदणी झाली असून आता पालकांना सोडतीची प्रतीक्षा आहे.जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या विनाअनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित (अल्पसंख्यांक दर्जाप्राप्त शाळा वगळता) शाळांमध्ये नर्सरी व पहिलीत वंचित व दुर्बल घटकातील बालकांना २५ टक्के कोट्यांतर्गत दरवर्षी प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. यामध्ये आठही तालुक्यातील शाळांची नोंदणी झाल्यानंतर त्या शाळेत प्रवेश मिळविण्याकरिता ऑनलाईन नोंदणी करुन सोडत पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्या जातो. गेल्या आठ वर्षाचा आढावा घेतला असता आरटीईअंतर्गत ८ हजार ५६६ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात आला आहे. पहिलीत प्रवेश मिळाल्यानंतर तो विद्यार्थी त्याच शाळेमध्ये आठवीपर्यंतचे शिक्षण घेत असल्याने आठ वर्षातील पहिली ते आठवी पर्यंतची विद्यार्थ्यांची संख्या बघित्ली असता आतापर्यं जवळपास आरटीईअंतर्गत ३० हजार ५१८ विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आहे.यावर्षीही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून १२४ शाळा सहभागी झाल्या आहे. या शाळांमध्ये नर्सरीकरिता ४८ तर पहिलीकरिता १२९९ जागा रिक्त असून जवळपास ३ हजार १६ अर्ज प्राप्त झाले असून कोणाला प्रवेश मिळते हे सोडतीनंतरच कळणार आहे.२०१८-२०१९ मध्ये सर्वाधिक विद्यार्थ्यांनी घेतला लाभआरटीई प्रवेशाकरिता दरवर्षी शाळांची नोेंदणी केली जातात. त्यांनतर त्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सोडतीनुसार प्रवेश दिल्या जातो. २०१२-२०१३ पासून तर २०१९-२० या आठ वर्षातील शैक्षणिक सत्राचा विचार केल्यास सर्वाधिक प्रवेश २०१८-१९ या सत्रात देण्यात आला. जवळपास १ हजार ४६७ विद्यार्थ्यांना यावर्षी प्रवेश मिळाला आहे. तर इतर वर्षाची आकडेवारी बघितल्यास २०१२-२०१३ या शैक्षणिक वर्षात सर्वात कमी केवळ ५४१ विद्यार्थ्यांनाच मोफत प्रवेश देण्यात आला. त्यासोबतच २०१३-२०१४ मध्ये १ हजार ४, २०१४-२०१५ मध्ये १ हजार १९१, २०१६-२०१७ मध्ये ७३४, २०१७-२०१८ मध्ये १ हजार २०९, २०१८-२०१९ मध्ये १ हजार ४६७ तर २०१९-२०२० मध्ये १ हजार ३१४ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आलापालकांकडून प्रवेशाकरिता प्रयत्नआरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रि येंतर्गत इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्येही गरजू विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्या जात असून घरापासून जवळच असलेल्या आणि या प्रक्रियेत सहभागी असलेल्या शाळांची निवड करुन पालकांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही रिक्त जागेच्या दुप्पट अर्ज दाखल करण्यात आल्याने आपल्याच पाल्याला प्रवेश मिळावा, याकरिता पालकांनी आपले सर्वोतोपरी प्रयत्न चालविले आहे.

टॅग्स :examपरीक्षा