शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘ईगल सिड्स बायोटेक’विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 05:00 IST

हिंगणघाट पंचायत समितीतील कृषी अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून ईगल सिड्स बायोटेक लिमिटेडवर हिंगणघाट पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ४२० सह बियाणे कायदा १९६६ कलम ६ बी, ७ बी बियाणे नियम १९६८ चे कलम ३४ ए (२) अन्वये गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे. बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्या कंपनीविरुद्ध कृषी विभागाने केलेल्या फौजदारी कारवाईमुळे इतर बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांचे धाबे दणाणले आहे.

ठळक मुद्देपं.स. कृषी अधिकाऱ्यांची तक्रार । सोयाबीनच्या बोगस बियाण्यांची विक्री भोवली

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांना सोयाबीनच्या बोगस बियाण्यांची विक्री केल्याप्रकरणी हिंगणघाट पंचायत समितीतील कृषी अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून ईगल सिड्स बायोटेक लिमिटेडवर हिंगणघाट पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ४२० सह बियाणे कायदा १९६६ कलम ६ बी, ७ बी बियाणे नियम १९६८ चे कलम ३४ ए (२) अन्वये गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे. बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्या कंपनीविरुद्ध कृषी विभागाने केलेल्या फौजदारी कारवाईमुळे इतर बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांचे धाबे दणाणले आहे.प्राप्त माहितीनुसार, हिंगणघाट तालुक्यातील शीतल विठ्ठल चौधरी, रा. गोविंदपूर या शेतकऱ्यासह इतर पाच शेतकऱ्यांनी एकूण २४.२० हे. क्षेत्रावर १० जून ते १३ जून या कालावधीत ईगल कंपनीच्या सोयाबीन बियाण्यांची पेरणी केली. परंतु, ईगल इक्सलंट प्लस हे सोयाबीन बियाणे अंकुरले नाही. या प्र्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी बियाणे कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी १९ जूनला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करून शेतकरी चौधरी यांनी केली.सदर तक्रार प्राप्त होताच २३ जूनला हिंगणघाटचे उपविभागीय कृषी अधिकारी एन. एन. घोडमारे, तालुका कृषी अधिकारी आर. बी. गायकवाड, पं.स.चे कृषी अधिकारी एम. एस. डेहनकर, मंडळ कृषी अधिकारी एस. डी. सुतार, आर. एस. गाडगे आदींनी तक्रारकर्त्या शेतकºयाचे शेत गाठून पाहणी केली. शिवाय बियाण्यांचे काही नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले. प्रयोगशाळेचा अहवाल ईगल कंपनीच्या विरोधात आल्यावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे व प्रभारी जिल्हा कृषी अधिकारी संजय बमनोटे यांच्या मार्गदर्शनात सदर कंपनीवर फौजदारी करवाई करण्यात आली आहे. असे असले तरी नुकसानग्रस्त शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.उगवण क्षमता केवळ १३ टक्केचकृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार ७० टक्क्यांपेक्षा जास्त उगवण क्षमता असल्यास एकरी २६ किलो सोयाबीन बियाणे पेरणीसाठी पुरेसे असते. मात्र, शेतकऱ्याने एकरी ३० किलो बियाणे पेरणी करून सुद्धा एका चौरस मध्ये सरासरी ३२ ते ३३ रोपे उगवणे आवश्यक असताना केवळ ४ रोपे एका चौरस मिटरमध्ये उगवल्याचे निदर्शनास आले म्हणजे कंपनीच्या सोयाबीन बियाणे वाणाची केवळ १३ टक्के उगवण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.मंत्र्याच्या दौऱ्यातून शेत वगळल्याचा आरोपहिंगणघाट तालुक्यात गोविंदपूर येथील शेतकरी शीतल विठ्ठल चौधरी यांच्या शेतातील ६० एकरातील ईगल कंपनीचे बियाणे उगवले नाही. कृषी मंत्र्यांनी सोमवारी दौरा आयोजित केला आहे. मात्र या दौऱ्यात गोविंदपूर वगळण्यात आल्याचा आरोप शेतकरी चौधरी व शिवसेनेचे नेते तुषार देवढे यांनी केला आहे.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र