लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कापशीच्या नदीपात्रातून वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती वर्धा वनपरिक्षेत्र कार्यालयाला मिळताच घटनास्थळ गाठले. वनविभागाच्या हद्दितून ही वाहतूक होत असल्याने वन विभागाने तीन ट्रॅक्टरसह एक वाहन जप्त करुन पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.संदेश पुरुषोत्तम उमरे, वैभव पांडुरंग इरपाचे व प्रशांत वसंतराव भोंगाडे तिघेही रा. शेकापूर (मोझरी) आणि अमोल जैनराव वासेकर रा. कापसी व संदीप मधुकर वानखेडे रा. वारा, अशी आरोपींची नावे आहेत. हे पाचही जण कापसी नदीतून अवैधरित्या वाळूचा उपसा करुन वाहने वनविभागाच्या जागेतून नेत होते. त्यामुळे वनविभागाने एम.एच.३२-४४९०, एम.एच. ३२-१८९६, एम.एच.३२-५१७६ क्रमांकाचे ट्रॅक्टर व ट्रॉली तसेच एम.एच.४८ ए.७९९८ क्रमांकाची वाहन असे चार ट्रॅक्टर व एक वाहन जप्त करुन ते वनपरिक्षेत्र कार्यालयात लावण्यात आले. ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी एस.एस.बन्सोड, क्षेत्र सहायक यु.व्ही. शिरपूरकर, कानगावचे वनरक्षक जे.बी. शेख, व्ही.बी. सोनवाने, एम.एस. माने, एम.एल. सज्जन, विनोद राऊत व वनमजूर यांनी केली.
वाळूची अवैध वाहतूक करणारी चार वाहने जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 05:00 IST
वनविभागाच्या हद्दितून ही वाहतूक होत असल्याने वन विभागाने तीन ट्रॅक्टरसह एक वाहन जप्त करुन पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वाळूची अवैध वाहतूक करणारी चार वाहने जप्त
ठळक मुद्देवनविभागाची कारवाई : पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल