शहरं
Join us  
Trending Stories
1
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
2
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
3
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
4
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
5
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
6
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
7
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
8
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
9
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
10
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
11
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
12
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
13
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
14
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
15
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
16
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
17
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
18
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
19
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
20
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”

एकाच रात्री चार चोऱ्या

By admin | Updated: July 26, 2015 00:24 IST

शहरातील मुख्य चौकातील जैन मंदिर परिसरातील गिरीराज ट्रेडर्स व पुरुषोत्तम टावरी यांच्या घरासह अन्य दोन ठिकाणी चोरट्यांनी हात साफ केला.

पुलगावात भीती : रोख लंपास करून धान्याची फेकाफेक पुलगाव : शहरातील मुख्य चौकातील जैन मंदिर परिसरातील गिरीराज ट्रेडर्स व पुरुषोत्तम टावरी यांच्या घरासह अन्य दोन ठिकाणी चोरट्यांनी हात साफ केला. यात चोरट्यांनी ४३ हजार रुपये रोख, सोन्याचे दागिणे लंपास केले तर दुकानातील धान्याची फेकाफेक केली. ही घटना शुक्रवारी रात्री घडली असून शनिवारी सकाळी उघड झाली. या चोरीत चोरट्यांनी लाखोंचा ऐवज व रोख लंपास केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. चोरीची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत पाहणी केली. ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. त्यांनी ठसे घेतले असले तरी पोलिसांच्या हाती कुठलाही सुगावा लागला नाही. या चोरांना पकडण्याचे आव्हान पुलगाव पोलिसांवर आले असून ते याचा किती दिवसात छडा लावतात याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. शहरातील कॅम्प व नाचणगाव मार्ग तसेच स्टेशन चौक ही महत्त्वाची ठिकाणे आहेत. याच मार्गावर मोठी व्यापारी प्रतिष्ठाने, बॅँका, मंदिर आहेत. रात्री पावसामुळे सर्वत्र सामसूम असताना दिगंबर जैन मंदिर येथे चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. त्याचा प्रयत्न फसल्यानंतर त्यांनी नाचणगाव मार्गावरील गिरीराज ट्रेडर्स या अनाज दुकानात मागच्या बोळीतून प्रवेश १० हजार रुपये रोख लंपास केले. काही तेलाचे लहान डबेही लंपास केले. यावेळी चोरट्यांनी तेलाचे पिपे फोडून व धान्याची फेकफाक केल्याचे मन्नु राठी यांनी सांगितले. या चोरीचा पंचनामा करतानाच येथील जीवन वीमा अधिकारी पुरुषोत्तम टावरी यांच्या घराच्या दुसऱ्या माळ्यावरील दार खुले दिसले. टावरी हे बाहेरगावी गेल्यामुळे शेजाऱ्यांच्या मदतीने मार्गावरील दर्शनी द्वार पोलिसांनी उघडले असता त्यांच्या कार्यालय व घरातील सर्वच दारे उघडी दिसली. या सर्व खोल्यातील लोखंडी व लाकडी कपाट उघडे दिसले. पलंगावर सोन्याच्या दागिण्याचा रिकामा बॉक्स व डब्बे दिसून आले. त्यातील दागिने चोरट्यांनी लंपास केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कपाटातील चांदीची भांडी कायम असल्याचे दिसून आले आहे. त्यांच्या घरातून २५ हजार रुपये रोख व १० ग्रॅमची सोन्याची चैन चोरट्यांनी लंपास केल्याचे समोर आले. चोरट्यांनी याच परिसरातील जगदीश दुबे यांच्या घरातही प्रवेश करण्याचा प्रयत्न केला; परंतु दाराची कडी न तुटल्यामुळे त्यांचा प्रयत्न फसला. या प्रकरणी पोलीस चौकशी सुरू असून परिसरात मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)