शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

चार दुकानांचा आगीत कोळसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 23:36 IST

येथील बाजार चौकातील दुकानाला मंगळवारी मध्यरात्री अचानक आग लागली. यात चार दुकानांचा कोळसा झाला. यामुळे दुकानदारांचे १ लाख १० हजार रुपयांचे नुकसान झाले. दुकानाजवळील तणस पेटविल्याने दुकानाला आग लागल्याचे सांगण्यात आले.

ठळक मुद्देतणस पेटविल्याने लागली आग : १ लाख १० हजारांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणी : येथील बाजार चौकातील दुकानाला मंगळवारी मध्यरात्री अचानक आग लागली. यात चार दुकानांचा कोळसा झाला. यामुळे दुकानदारांचे १ लाख १० हजार रुपयांचे नुकसान झाले. दुकानाजवळील तणस पेटविल्याने दुकानाला आग लागल्याचे सांगण्यात आले.मंगळवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात इसमांनी पानाच्या दुकानालगतचे तणस पेटविले. यात ज्ञानेश्वर तोटे यांचे पानाचे दुकान जळून खाक झाले. या आगीने अन्य तीन दुकानेही कवेत घेतली. यात गणेश पोकळे यांचे भाजीपाल्याचे दुकान, सुरेंद्र अतकरे यांचे कटींगचे सलुन तर रमेश कापसे यांच्या विद्युत उपकरणांच्या दुरूस्ती दुकानाचा कोळसा झाला. शिवाय दुकानाजवळ ठेवून असलेली संदीप ठाकरे यांची दुचाकीही जळाली. रात्री २ वाजताच्या सुमारास आगीच्या ज्वाळा व धूर दिसताच उमेश पोकळे यांनी ग्रामस्थांना जागे करीत आग विझविण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांच्या प्रयत्नांनी आग विझविण्यात आल्याने इतर दुकाने बचावली. जळालेल्या दुकानाचा अद्यापही पंचनामा करण्यात आला नाही. यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.आग लावल्याचा संशयसदर दुकानांमध्ये रात्री कुणीही काम करीत नव्हते. चार दुकानात विद्युत पुरवठा नसल्याने शॉट सर्कीट वा स्पार्किंगचा प्रश्न नाही. यामुळे ही आग लावण्यात आली असावी, असा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला. पानाच्या दुकानावर पानाचे पेटारे व तणस ठेवून होते. अज्ञात इसमांनी त्या तणसाला आग लावल्याचे निदर्शनास आले. तणसामुळे इतर दुकानेही जळालीत.

टॅग्स :fireआग