शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

वर्धा आगाराच्या ताफ्यात आता चार अत्याधुनिक ‘शिवशाही’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 06:00 IST

नवनव्या सुविधा, तंत्रज्ञानामुळे एसटी महामंडळ हायटेक होत आहे. आगारात दाखल झालेल्या या गाड्या २३० अश्वशक्तीच्या असून यात सीसीटीव्ही कॅमेरे, संकटकालीन स्थिती निर्माण झाल्यास हॅमरची सुविधा, ड्रायव्हर अ‍ॅडजस्टमेंट सिट, ऑटो स्क्रीन यासोबतच दिल्लीत घडलेल्या निर्भया प्रकरणापासून पॅनिक बटनचा बसगाड्यांमध्ये नव्याने समावेश करण्यात आला आहे.

ठळक मुद्देआता प्रवासही होणार ‘शाही’

सुहास घनोकार।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा एसटी आगाराच्या ताफ्यात शुक्रवारी चार अत्याधुनिक शिवशाही बसगाड्या दाखल झाल्या असून लवकरच प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार आहेत. या गाड्यांमुळे लांब पल्ल्याच्या प्रवाशांचा प्रवास अतिशय आरामदायी होणार आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात वर्धा आगाराचे पाऊल पुढे पडते आहे.वर्धा विभागांतर्गत वर्ध्यासह आर्वी, हिंगणघाट, तळेगाव (श्या. पंत), पुलगाव हे आगार आहेत. संपूर्ण विभागात एकूण २६५ गाड्या आहेत. या गाड्यांत आता नव्याने चार वातानुकूलित, अत्याधुनिक शिवशाही गाड्यांची भर पडली आहे. नवनव्या सुविधा, तंत्रज्ञानामुळे एसटी महामंडळ हायटेक होत आहे. आगारात दाखल झालेल्या या गाड्या २३० अश्वशक्तीच्या असून यात सीसीटीव्ही कॅमेरे, संकटकालीन स्थिती निर्माण झाल्यास हॅमरची सुविधा, ड्रायव्हर अ‍ॅडजस्टमेंट सिट, ऑटो स्क्रीन यासोबतच दिल्लीत घडलेल्या निर्भया प्रकरणापासून पॅनिक बटनचा बसगाड्यांमध्ये नव्याने समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी सर्वच बसगाड्यांमध्ये मोफत वायफाय सुविधा कार्यान्वित करण्यात आली. आगामी काळात विभागातील सर्वच गाड्यांना व्हेईकल ट्रेकिंग सिस्टम (व्हीटीएस) यंत्रणा बसविण्यात येणार आहे. ही यंत्रणा बसविण्याकरिता महामंडळाच्या वतीने जिल्ह्यातील संपूर्ण बसथांब्याचे मॅपिंग झालेले आहे. या यंत्रणेमुळे प्रवाशांना घरबसल्याच एसटी बस नेमकी कुठे आहे, हे कळू शकणार आहे. याकरिता डेपोमध्ये साहित्य आले आहे. त्यामुळे नववर्षापूर्वी एसटी बसच्या प्रत्येक बसगाडीचे ठिकाण घरबसल्या आणि कुठेही कळणार आहे.या वातानुकूलित अत्याधुनिक शिवशाही बसगाड्या आगामी काही दिवसांत वर्धा-शिर्डी आणि वर्धा-शेगाव अशा लांब पल्ल्यावर धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास आरामदायी होणार आहे. वर्धा विभागाच्या वतीने आणखी गाड्यांची मागणी नोंदविण्यात आली आहे. येत्या काळात आगाराच्या ताफ्यात आणखी शिवशाही गाड्यांची भर पडणार आहे.-महेंद्र नेवारे, यंत्र अभियंता (चालन), वर्धा विभाग

टॅग्स :Shivshahiशिवशाही