लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा/ यवतमाळ: भरधाव वेगाने चालणाऱ्या गाडीसमोर अचानक प्राणी आल्याने गाडी अनियंत्रित होऊन झाडावर आदळून झालेल्या अपघातात चालकासह एक जण जागीच ठार झाल्याची घटना वर्धा जिल्ह्यातील बोरगाव (आलोडा) येथे गुरुवारच्या मध्यरात्री घडली. औरंगाबादचे संतोष कृष्णराव काळे (६०) व सतीश चंद्रकांत वडतकर (५०) हे वाहन क्र. एम.एच. १५-सीएम ४२१५ या चारचाकी वाहनाने कानगाव येथून वर्ध्याकडे येत असताना हा अपघात घडला. हा अपघात एवढा भीषण होता की त्यात या दोघांचाही जागीच मृत्यू झाला.दुसरा अपघात यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्याच्या सवना येथे मध्यरात्रीनंतर घडला. सुमन गिरीधारी (५५) व रवी परशुराम बेलखेडे (२५) हे दोघेही इंडिका कारने येत असताना ती आॅटोरिक्शाला धडकली. यात या दोघांचेही निधन झाले तर आॅटोतील दोघेजण गंभीर जखमी झाले. यातील रवीचे २० एप्रिल रोजी लग्न ठरले होते.
विदर्भात दोन वेगवेगळ्या अपघातात चार ठार, दोन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 10:20 IST
यवतमाळ: भरधाव वेगाने चालणाऱ्या गाडीसमोर अचानक प्राणी आल्याने गाडी अनियंत्रित होऊन झाडावर आदळून झालेल्या अपघातात चालकासह एक जण जागीच ठार झाल्याची घटना वर्धा जिल्ह्यातील बोरगाव (आलोडा) येथे गुरुवारच्या मध्यरात्री घडली.
विदर्भात दोन वेगवेगळ्या अपघातात चार ठार, दोन जखमी
ठळक मुद्देजंगली जनावर रस्त्यात आल्याने गाडी अनियंत्रितमृताचे २० एप्रिलला ठरले होते लग्न