शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या कातडीची तस्करी करणारे चौघे वनविभागाच्या गळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2021 05:00 IST

वन्यजीवांच्या कातडीची तस्करी करणाऱ्यांचा मोठा व्यवहार वर्धा शहरातील सिव्हील लाईन भागात होणार असल्याची माहिती नागपूर येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर नागपूर येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती तातडीने वर्धा येथील उपवनसंरक्षक शेपट यांना दिली. माहिती मिळताच वर्धा वनविभागातील अधिकारी व कर्मचारी अलर्ट मोडवर आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गोपनीय माहितीच्या आधारे वर्धा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोरून बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या चौघांना ताब्यात घेतले आहे. या कारवाई दरम्यान वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आरोपींकडून बिबट्याची कातडी जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेल्या बिबट्याच्या कातडीची नेमकी किंमत किती हे अजूनही स्पष्ट करण्यात आले नसले तरी या कातडीचा लाखाेंमध्येच सौदा करण्यात आला होता, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या आतापर्यंतच्या चाैकशीत पुढे आले आहे.वन्यजीवांच्या कातडीची तस्करी करणाऱ्यांचा मोठा व्यवहार वर्धा शहरातील सिव्हील लाईन भागात होणार असल्याची माहिती नागपूर येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर नागपूर येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती तातडीने वर्धा येथील उपवनसंरक्षक शेपट यांना दिली. माहिती मिळताच वर्धा वनविभागातील अधिकारी व कर्मचारी अलर्ट मोडवर आले. त्यानंतर वर्धा शहरातील सिव्हील लाईन भागातील विविध परिसरावर वर्धा वनपरिक्षेत्र अधिकारी रुपेश खेडकर यांच्या नेतृत्वात वनविभागाच्या चमूंद्वारे पाळत ठेवण्यात आली. दरम्यान, काही व्यक्तींवर संशय आल्याने त्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडील साहित्याची पाहणी केली असता बिबट्याची कातडी मिळून आली. ती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली आहे. या प्रकरणात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वकील अहमद शेख (४१) व महेंद्र अशोक आत्राम (४५, दोन्ही रा. वर्धा) तसेच दिलीप कुरसंगे (५३) आणि विनायक टिवलुजी मडावी (दोन्ही रा. चंद्रपूर) यांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. तर या प्रकरणात आणखी दोन व्यक्तींचा समावेश असून त्यांचा शोध वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेतला जात आहे.

शिकार नेमकी झाली कुठे?-    या प्रकरणात आरोपींकडून बिबट्याची कातडी जप्त करण्यात आली आहे. असे असले तरी या बिबट्याची शिकार नेमकी कुणी आणि कुठे केली यासह विविध बाबींची माहिती सध्या वनविभागाचे अधिकारी घेत आहेत. शिवाय फरार असलेल्या आरोपींना लवकरच जेरबंद करण्यात येईल असा विश्वास वनविभागाकडून व्यक्त केला जात आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपी असून त्यांचा शोध घेतला जात आहे.- रुपेश खेडकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, वर्धा. 

 

टॅग्स :leopardबिबट्याforest departmentवनविभाग