शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांविरोधात माजी खासदार करणार आत्मक्लेश; भाजपामध्ये खदखद

By आनंद इंगोले | Updated: September 8, 2023 22:16 IST

कार्यकर्त्यांबद्दल अपशब्द बोलल्याचा आरोप

आनंद इंगोले

वर्धा : भारतीय जनता पार्टीच्या वर्धा शहर व ग्रामीण मंडळातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आमदार डॉ. पंकज भोयर यांनी कार्यकर्त्यांसंदर्भात अपशब्द वापरले, असा आरोप माजी खासदार सुरेश वाघमारे यांनी केला. या घटनेला आठ दिवसाचा कालावधी झाला तरीही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी कोणतीही दखल घेतली नसल्याने  त्यांनी भाजप जिल्हा कार्यालयात शनिवारी दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आत्मक्लेश आंदोलन करण्याचा निर्णय फेसबूक लाईव्हमधून जाहीर केल्याने राजकीय खळबळ उडाली आहे.

भाजपाचे माजी खासदार सुरेश वाघमोर यांनी शुक्रवारी पत्रकारांशी चर्चा करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यामध्ये ‘वर्ध्यात २ सप्टेंबरला भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत आमदार डॉ. पंकज भोयर यांनी नागपुरला जाणाऱ्या कार्यकर्त्यांच्या संदर्भात अपशब्द वापरले असून त्यांचे हे वर्तन चुकीचे आहे. भाजपने नेहमीच कार्यकर्त्यांचा आदर केला आहे. कार्यकर्ते ही भाजपच्या रथाची चाके असून त्यांच्यामुळेच पक्ष आघाडीवर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा सामान्य कार्यकर्त्यांचा मान राखतात. परंतु आमदारांकडून याच कार्यकर्त्यांना असे शब्द वापरणे योग्य नाही, त्यांनी याबद्दल कोणतीही खंत व्यक्त केली नाही, असेही माजी खासदार सुरेश वाघमारे म्हणाले.

यासंदर्भात जिल्हाध्यक्ष गफाट यांना माहिती असून आठ उलटूनही कोणताच ठोस निर्णय घेतला गेला नसल्यामुळे कार्यकर्त्यांच्या सन्मानाकरिता हा निर्णय घ्यावा लागत असल्याचेही ते व्हिडिओमध्ये म्हणाले आहे. यावरुन भाजपात खदखद सुरु असून पुढे काय होते, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.कार्यकर्ता हाच पक्षाची ताकद आहे. त्यांच्या भरोवशावरच मी आमदार झालो आहे, याची जाणीव मला आहे.  त्यामुळे कोणत्याही कार्यकर्त्यांना दुखावणे माझ्या स्वभावातच नाही. मी कार्यकर्त्यांबद्दल अपशब्द वापरले नाही. काही कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरुन एका पदाधिकाºयाबद्दल बोललो, बस इतकचं. याता याचा कोण कसा अर्थ काढावा, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.डॉ. पंकज भोयर, आमदार, वर्धा.