शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यात हिंगणीच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना सर्व्हेअर मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 11:43 IST

समृद्धी महामार्गाचा कंत्राट मिळालेल्या अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने आपल्या सहकंत्राटदाराला हाताशी घेऊन सेलू तालुक्यातील कोटंबा शिवारातील सर्व्हे क्रमांक २०६ मध्ये कुठलीही परवानगी न घेता डेरेदार वृक्षाची कत्तल आणि मनमर्जीने उत्खनन केल्याची बाब उजेडात आली आहे.

ठळक मुद्देवनविभागाच्या जागेवर उत्खनन अन् वृक्षतोडअ‍ॅफकॉन्सचा भंडाफोड

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : समृद्धी महामार्गाचा कंत्राट मिळालेल्या अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने आपल्या सहकंत्राटदाराला हाताशी घेऊन सेलू तालुक्यातील कोटंबा शिवारातील सर्व्हे क्रमांक २०६ मध्ये कुठलीही परवानगी न घेता डेरेदार वृक्षाची कत्तल आणि मनमर्जीने उत्खनन केल्याची बाब उजेडात आली आहे. पण, नेमक्या किती जागेवर उत्खनन करण्यात आले, याचे मोजमाप करण्यासाठी वर्ध्याचे उपवनसंरक्षक यांना पत्रव्यवहार करूनही वनविभागाचा सर्व्हेअरच उपलब्ध करून दिला गेलेला नाही.कोटंबा ग्रा.पं.च्या कार्यक्षेत्रात येणाºया सर्व्हे क्रमांक २०६ मध्ये कुठलीही परवानगी न घेता अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या माध्यमातून उत्खनन करून तेथील मुरमाची उचल करण्यात आली. इतकेच नव्हे, तर या खोदकामादरम्यान डेरेदार वृक्षांची कत्तल करण्यात आली. कंपनीच्या माध्यमातून झालेले खोदकाम अवैध असल्याचे लक्षात येताच संदीप मधुकर खेडकर यांनी सामाजिक भान जोपासून कोटंबा ग्रा.पं. प्रशासनाकडे विचारणा केली.मात्र, या ग्रा.पं. प्रशासनाकडे कुठलीही माहिती नसल्याचे खेडकर यांना लेखी कळविले आहे. पत्रावर कोटंबा ग्रा.पं. च्या सचिवांची स्वाक्षरी आहे. वनविभागाच्या जागेवर उत्खनन व वृक्षकत्तल झाल्याची माहिती मिळताच वनविभागानेही नेमक्या किती जागेवर उत्खनन झाले, याची माहिती जाणून घेण्यासाठी वनविभागाचा सर्व्हेअर उपलब्ध करून देण्यात यावा, असे विनंतीपत्र वर्ध्याचे उपवनसंरक्षक सुनील शर्मा यांना पाठविले.पण, त्या पत्रालाही केराची टोपली दाखविली जात असल्याचे वनविभागातील खात्रीदायक सूत्रांनी सांगितले.कायदा काय म्हणतो?एखाद्या व्यक्तीने संरक्षित किंवा राखीव वनजमिनीतून वृक्षांची कत्तल करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने लाकडाची विल्हेवाट लावली असल्यास वनविभागाला पुरावा नष्ट करण्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यासाठी भादंविच्या कलम २०१ वापर करावा लागतो. कारण भारतीय वन अधिनियम १९२७ मध्ये अशा प्रकारचा गुन्हा घडल्यास कुठल्या कलमान्वये गुन्हा दाखल करावा, याची नोंदच नसल्याचे सांगण्यात आले. तर संरक्षित वनजमिनीवरील वृक्षांची अवैध तोड केल्यास भारतीय वन अधिनियम १९२७ च्या कलम ३२ (ए.) तर राखीव वनजमिनीवर अवैध वृक्षतोड झाल्यास भारतीय वन अधिनियम १९२७ कलम २६ (१), (अ),(ड) अन्वये गुन्हा दाखल केला जात असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.तोडलेल्या वृक्षांची लावली विल्हेवाटकोटंबा शिवारातील वनविभागाकडे हस्तांतरित झालेल्या ज्या जमिनीवरील वृक्षांची कुठलीही परवानगी न घेता कत्तल करण्यात आली, त्याच वृक्षांच्या अवशेषाची पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने विल्हेवाट अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्याच माध्यमातून लावण्यात आली आहे. पण, काही लाकडं अजूनही घटनास्थळी असल्याचे बघावयास मिळते.उत्खनन आणि वृक्षतोडीची मौखिक माहिती मिळाल्यानंतर आम्ही नेमक्या किती जागेवर हा गैरप्रकार झाला, याची इत्थंभूत माहिती जाणून घेण्यासाठी सर्व्हेअर उपलब्ध करून देण्यासाठीचे लेखी पत्र उपवनसंरक्षक अधिकारी कार्यालयाला पाठविले आहे. सर्व्हेअर उपलब्ध झाल्यावर माहिती मिळेल.- अभय ताल्हण, प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी, हिंगणी.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग