शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

महामार्गाच्या जागेवर वनविभागाचा डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 05:00 IST

वनविभागाला वन कर्मचारी निवासस्थान व कार्यालय बांधकामाला जुना सर्व्हे क्र. १०५ (ख) व नीन सर्व्हे क्र. १७८ प्रमाणे आराजी १.२१ हे.आर. जमीन राज्य शासनाकडून देण्यात आली होती. मात्र, वनविभागाने सर्व परिसीमा ओलांडत तब्बल ३ हेक्टर जागेवर अनधिकृतरीत्या कब्जा केला. वनाधिकारी अमोल चौधरी यांनी राष्ट्रीय महामार्गासाठी अस्तित्वात असणारी ३० मीटर जागा विचारात न घेता मधेच अतिक्रमण करून तारेचे कुंपण घातल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.

ठळक मुद्देहडपली १३ मीटर जागा : नागरिकांची वनविभागावर धडक

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : तळेगाव, आष्टी, साहूर, द्रुगवाडा या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात वनविभागाने १३ मीटर जागा हडप करीत तारेचे कुंपण घातले. नगरपंचायतची जागा हडप करूनही वनविभागाकडून गुन्हे करण्याची धमकी दिली जात होती. याविरुद्ध २०० नागरिकांनी वनविभागावर धडक दिली. याप्रकरणी २२ पत्रकार परिषदेतून अन्यायाला वाचा फोडली.वनविभागाला वन कर्मचारी निवासस्थान व कार्यालय बांधकामाला जुना सर्व्हे क्र. १०५ (ख) व नीन सर्व्हे क्र. १७८ प्रमाणे आराजी १.२१ हे.आर. जमीन राज्य शासनाकडून देण्यात आली होती. मात्र, वनविभागाने सर्व परिसीमा ओलांडत तब्बल ३ हेक्टर जागेवर अनधिकृतरीत्या कब्जा केला. वनाधिकारी अमोल चौधरी यांनी राष्ट्रीय महामार्गासाठी अस्तित्वात असणारी ३० मीटर जागा विचारात न घेता मधेच अतिक्रमण करून तारेचे कुंपण घातल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. या अतिक्रमणामुळे सद्यस्थितीत रस्त्याच्या कामावर परिणाम झाला. राष्ट्रीय महामार्ग विभागाने ६० मीटर लांबीच्या भागातील काम बंद ठेवले.याची माहिती वनाधिकाऱ्यांना दिल्यावर त्यांनी एक मीटर जागा देण्याची तयारी दर्शविली. मात्र, ही जागा अपुरी असल्यामुळे नागरिक संतप्त झाले.याचा जाब विचारण्यास वनविभागावर धडकले. यानंतर भाजप शहर अध्यक्ष अ‍ॅड. मनीष ठोंबरे, तालुकाध्यक्ष कमलाकर निंभोरकर, मंगेश बालपांडे, अनिल कठाणे, तुषार खोडे, राहुल कोल्हे, हेमराज खोडे, अ‍ॅड. प्रकाश गायकवाड, प्रतीक माणिकपुरे, चंदू मदनकर, गोपाल चन्ने, बबलु गवळी, रवी वानखडे, राहुल कठाणे, आशीष ठाकरे, शुभम गवळी आदींनी तहसीलदार आशीष वानखेडे यांची भेट घेत न्यायाची मागणी केली. त्यानंतर शहीद स्मारकात पत्रकार परिषद घेऊन वनविभागावर अतिशय गंभीर आरोप करण्यात आले.वनविभागाने स्वत:च अतिक्रमण करून रस्ता ताब्यात घेतला. वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी दंडेलशाही करीत आहेत. एसआरपी बोलावून गुन्हे दाखल करायची धमकी देतात. सामान्य जनतेवर अन्याय करून वनविभाग लोकशाहीचा गळा घोटत आहे. त्यांच्या या कृत्याचा जाहीर निषेध करून रस्त्याचे अतिक्रमण तत्काळ न काढल्यास रास्ता रोको आंदोलन करू.- अ‍ॅड. मनीष ठोंबरे, नगरसेवक तथा शहर अध्यक्ष, भाजप, आष्टी (शहीद).वनविभागाने कुठलेही अतिक्रमण केलेले नाही. भूमि अभिलेख विभागाकडे मोजणी टाकली. मोजणीनंतर जी स्थिती राहील, ती वनविभाग विचारात घेईल.- अमोल चौधरी, वनपरिक्षेत्र अधिकारी, आष्टी (शहीद).भूमि अभिलेखच्या निर्णयावर रस्त्याचे भविष्य अवलंबून राहणार आहे. मोजणीच्या दिवशी परिसरातील रहिवासी हजर राहू वनविभागाविरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार.- अ‍ॅड. प्रकाश गायकवाड, आष्टी (शहीद).

टॅग्स :highwayमहामार्ग