शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसह कष्टकऱ्यांच्या मागण्यांसाठी अन्नत्याग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 22:27 IST

शेतकरी, कष्टकरी तसेच समाजातील दुर्बल घटकांच्या विविध मागण्यांसाठी प्रहारच्या पं.स. सदस्या अरुणा सावरकर, प्रहारचे देवळी-पुलगाव विधानसभा क्षेत्र प्रमुख राजेश सावरकर व रसुलाबाद पं.स. सर्कलमधील काही सुजान नागरिकांनी सोमवार १९ नोव्हेंबरपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.

ठळक मुद्देप्रहारचे आंदोलन : आर्वी पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : शेतकरी, कष्टकरी तसेच समाजातील दुर्बल घटकांच्या विविध मागण्यांसाठी प्रहारच्या पं.स. सदस्या अरुणा सावरकर, प्रहारचे देवळी-पुलगाव विधानसभा क्षेत्र प्रमुख राजेश सावरकर व रसुलाबाद पं.स. सर्कलमधील काही सुजान नागरिकांनी सोमवार १९ नोव्हेंबरपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. सदर मागण्या निकाली निघाव्या यासाठी संबंधितांना वेळोवेळी निवेदन देऊनही दुर्लक्ष करण्यात आल्याने संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीच्या निषेधार्थ हे आंदोलन आर्वी पं.स. कार्यालयासमोर डेरा टाकून सुरू करण्यात आले आहे.आर्वी पं.स.तील रसुलाबाद सर्कल मधील चांगल्या सुविधा मिळाव्या म्हणून पं.स. सदस्य अरुणा सावरकर यांनी यापूर्वी पं.स. सभागृहात सदर विषय मांडले. इतकेच नव्हे तर संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून सदर समस्या निकाली काढण्याची विनंती केली. परंतु, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी दिलेल्या निवेदनांना केराची टोपलीच दाखविल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांचा आहे. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षीत धोरणांचा निषेध करण्यासाठी तसेच तालुका प्रशासनाचे सदर मागण्यांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधण्यासाठी अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात पं.स. सदस्य अरुणा सावरकर, राजेश सावरकर यांच्या नेतृत्त्वात अजय भोयर, बिट्टू रावेकर व ग्रामस्थ सहभागी झाले आहेत.आंदोलनकर्त्यांच्या मागण्यारोजगार हमी योजनेतील अनुदानाचे तात्काळ वाटप करण्यात यावे.रसुलाबाद येथील राजीव गांधी भवनचे काम मागील १० वर्षांपासून रखडले असून त्याला तात्काळ गती देण्यात यावी.घरकुल मधील सावळ्या गोंधळाचा त्रास गरजुंना होत असून तो दूर करण्यासाठी योग्य पाऊल उचलावेत.दिव्यांगांच्या वाट्याचा ३ टक्के निधी जिल्ह्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांनी खर्च केला नसून त्यांना तो खर्च करण्यासाठी लेखी सूचना देण्यात याव्या. दिव्यांगांना घरकुल योजनेचा लाभ प्राधान्य क्रमाने देण्यात यावा.कवठा मार्गाची दैनावस्था झाली असून या रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यात यावे. बाºहा हे गाव आदिवासी बहूल असून या गावात प्राथमिक सोयी-सूविधांचा अभाव आहे. या कावाचा विकास करण्यात यावा. कुठलाही गरजू शासकीय योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये म्हणून तालुक्यात सर्वेक्षण करण्यात यावे. मनमर्जीने काम करणाऱ्या टेंभरी येथील अंगणवाडी सेविकेवर चौकशी करून निलंबनाची कारवाई करण्यात यावी.