शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

अन्न महामंडळाच्या गोदामांचा स्ट्राँग रूमकरिता वापर करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 23:51 IST

लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानानंतर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट ठेवण्यासाठी भारतीय खाद्य निगमचे गोदाम स्ट्राँग रुम म्हणून वापरण्यात येते. यासाठी भारतीय अन्न महामंडळाचे गोदाम अधिग्रहित करण्यात येते. मात्र, सद्यस्थितीत गोदामामध्ये मोठ्या प्रमाणात धान्यसाठा आहे.

ठळक मुद्देविवेक भिमनवार : तत्काळ रिते करण्याबाबत दिले निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानानंतर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट ठेवण्यासाठी भारतीय खाद्य निगमचे गोदाम स्ट्राँग रुम म्हणून वापरण्यात येते. यासाठी भारतीय अन्न महामंडळाचे गोदाम अधिग्रहित करण्यात येते. मात्र, सद्यस्थितीत गोदामामध्ये मोठ्या प्रमाणात धान्यसाठा आहे.स्ट्रॉग रुमची व्यवस्था करण्यासाठी भारतीय खाद्य निगमने हे गोदाम तत्काळ खाली करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी दिलेत. जिल्हाधिकारी यांनी अन्न महामंडळाच्या गोदामाला भेट देत पाहणी केली. यावेळी पोलिस अधीक्षक बसवराज तेली, अपर जिल्हाधिकारी संजय दैने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गजानन टाके, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बन्सोड व खाद्य निगमचे अधिकारी उपस्थित होते.यावर्षी लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारींना त्यांनी केलेल्या मतदानाची खात्री पटण्यासाठी ईव्हीएम मशीन सोबत व्हीव्हीपॅट मशीन राहणार आहे. त्यामुळे यावेळी जास्त जागा लागणार आहे. तसेच मतदान केंद्राची संख्या वाढल्यामुळे आणि उमेदवारांची संख्या १५ पेक्षा जास्त असल्यास अधिकचे बॅलेट युनिट वाढण्याची शक्यता लक्षात घेता स्ट्राँग रुमसाठी जागा निश्चित करावी. गोदामाच्या सर्व खिडक्या आणि व्हेंटिलेशन बंद करावे. गोडाऊनचे छताची गळती बंद करुन घ्यावी. पोलिसांनी स्ट्राँग रुमच्या सुरक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवाव्या, त्यानुसार सुरक्षेच्या दृष्टीने कठडे उभारावे. गोदामाच्या पसिरात येणाऱ्या रेल्वे मार्गाचे गेट बंद करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.स्ट्राँग रुमच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात राहणाºया केंद्रीय राखीव सुरक्षा बलाच्या जवानांसाठी शौचालय, स्नानगृह, पिण्याचे आणि वापराचे पाणी आदी मूलभूत सुविधा करण्यात याव्या, सर्व अधिकाऱ्यांनी एकमेकांच्या संपर्कात राहून सर्व स्ट्राँगरुमची व्यवस्था करावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीElectionनिवडणूक