शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
4
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
5
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
6
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
7
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
8
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
9
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
10
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
11
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
12
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
13
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
14
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
15
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
16
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
17
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
19
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
20
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार

गर्दीच्या ९६ ठिकाणी ड्रोनद्वारे पाळत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्ह्यात एकूण ९६ ठिकाणी जीवनावश्यक साहित्याची खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असल्याची नोंद जिल्हा ...

ठळक मुद्दे३४७ वाहने जप्त : नियम मोडणाऱ्यांकडून ११.४३ लाखांचा दंड वसूल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात एकूण ९६ ठिकाणी जीवनावश्यक साहित्याची खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. याच ठिकाणी नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंग पाळल्या जात की नाही यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांच्या मदतीने पाळत ठेवली जात आहे. इतकेच नव्हे तर जो कुणी सोशल डिस्टन्सिंगकडे पाठ दाखवतोय त्याच्यावर कारवाइृ केली जात आहे. जिल्हा प्रशासनाकडून दिलेल्या सूचनांकडे पाठ दाखविणाऱ्यांकडून आतापर्यंत ११ लाख ४३ हजार ६०१ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे तर विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या ३४७ व्यक्तींची वाहने जप्त करण्यात आली आहे.जिल्ह्यातील सहा नगरपालिका तसेच चार नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात एकूण ३४ क्रॉऊड झोन असल्याची नोंद घेण्यात आली आहे. याच ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा अबलंब व्हावा म्हणून वर्ग एक आणि वर्ग दोनच्या एकूण १० अधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वात विशेष पथक तयार करण्यात आले आहेत. या पथकांमध्ये एकूण ९० स्वयंसेवकांचा समावेश आहे. वर्धा जिल्ह्यातील ३६८ किराणा दुकानातून सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून नागरिकांना जीवनावश्यक साहित्यांची विक्री केली जात आहे. परंतु, काही व्यक्ती सोशल डिस्टन्सिंग तसेच जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांकडे पाठ करीत असल्याचे लक्षात आल्याने एकूण १७४ व्यक्तींवर गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे. तर ३४७ व्यक्तींची वाहने जप्त करण्यात आली आहे. तर सोमवार १३ एप्रिलपर्यंत ११ लाख ४३ हजार ६०१ रुपयांचा दंड वसूल केला आहे. लॉकडाऊन मध्ये नागरिकांनीही सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.जिल्ह्यातील नागरी क्षेत्रात ४८ झोपडपट्ट्यावर्धा जिल्ह्यातील नागरी क्षेत्रात एकूण ४८ झोपडपट्ट्या असल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. यात ३० इतक्या सर्वाधिक वर्धा उपविभागात असून आर्वी आणि हिंगणघाट या उपविभागात प्रत्येकी नऊ झोपडपट्ट्या असल्याचे सांगण्यात आले. या ठिकाणीही पोलिसांंची करडी नजर आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस