शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

राष्ट्रवादी काँगे्रसकडून आघाडी धर्माचे पालन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 21:26 IST

वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील विधान परिषदेच्या जागेवर काँग्रेस राष्ट्रवादी काँगे्रस आघाडीचे उमेदवार इंद्रकुमार बालमुकूंद सराफ यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे हिंगणघाट नगर परिषदेचे गटनेते सौरभ तिमांडे यांनी आपला पाठींबा जाहीर केला आहे.

ठळक मुद्देतिमांडेंनी जाहीर केला काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील विधान परिषदेच्या जागेवर काँग्रेस राष्ट्रवादी काँगे्रस आघाडीचे उमेदवार इंद्रकुमार बालमुकूंद सराफ यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे हिंगणघाट नगर परिषदेचे गटनेते सौरभ तिमांडे यांनी आपला पाठींबा जाहीर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख यांच्या महादेवपुरा येथील कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, राकाँचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार विधान परिषद निवडणूकीतून आपण माघार घेऊन काँग्रेस-राकाँ आघाडीच्या उमेदवाराला समर्थन देत असल्याचे सौरभ तिमांडे यांनी सांगितले. याबाबतची घोषणा बुधवारी पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार सुरेश देशमुख यांनी केली होती. त्यानंतर गुरूवारी याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी धर्माचे पालन करीत हा निर्णय घेतला आहे; पण काँग्रेसकडून अद्याप कुठलाही संवाद आपल्याशी झालेला नसल्याची माहितीही माजी आमदार राजू तिमांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.सौरभ तिमांडे यांनी विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर तीनही जिल्ह्यांमध्ये आपण प्रचार सुरू केला होता; पण राष्ट्रवादी काँगे्रसच्या वरिष्ठ नेत्यांनी सूचना केल्यानंतर आपण सदर निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख, वसंतराव कार्लेकर, प्रा. राजू तिमांडे, राकाँचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत यांच्यासह उमेदवार सौरभ तिमांडे उपस्थित होते.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस