शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यात यंदा चारा टंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 15:07 IST

गेल्या पावसाळ्यात जिल्ह्यात केवळ ७७ टक्केच पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील पाचशेवर गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागात जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देजलस्तर आटला अनेक गावांना दहा दिवसांनंतरच पाणीपुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गेल्या पावसाळ्यात जिल्ह्यात केवळ ७७ टक्केच पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील पाचशेवर गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागात जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक गावांतील जनावरे दुसऱ्या गावात स्थानांतरित करण्यात येत आहेत.जिल्ह्यात खरिपात प्रमुख पीक कापूस व सोयाबीन हेच आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने चाराटंचाईचा प्रश्न मार्च महिन्यानंतर भेडसावू लागला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मोठ्या गुरांच्या बाजारात जनावरे विक्रीसाठी शेतकऱ्यांची गर्दी वाढली आहे. काही भागात सोयाबीनचे कुटार चारा म्हणून वापरले जाते. परंतु, यावर्षी सोयाबीनवरही रोग आला. उत्पादन घटले, त्यामुळे चाºयाची टंचाई जाणवत आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले असले तरी भूगर्भातच पाणीसाठा कमी होत असल्याने ग्रामीण व शहरी भागात केला जाणारा पाणीपुरवठा कपात करण्यात आला आहे. वर्धा शहरासह ११ गावांना दरररोज महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा केला जात होता. धाम नदी, पवनार व येळाकेळी येथून पाणीपुरवठा कमी होत असल्याने शहरात आता दहा दिवसानंतर नळ येतात. मोठ्या गावांमध्येही ही परिस्थिती आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्यात शेतकरीही यावेळी अडचणीत आहे. प्रशासनाने आष्टी तालुक्यात चारा छावणी मंजूर केली आहे, मात्र अद्याप छावणी सुरू झाली नसल्याची माहिती आहे. तसेच जिल्ह्यातील या गावात पाणी कमी आहे. तेथे चारा टंचाईचा प्रश्न निर्माण झाल्याने जनावरे मोठ्या प्रमाणावर स्थानांतरित केली जात आहेत.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई