शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

कामांच्या गुणवत्तेवर भर द्या, अन्यथा कारवाईला सामोरे जा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 22:28 IST

पंचायत राज व्यवस्थेमध्ये ग्रामपंचायत स्तरावर मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो. हा निधी योग्यरीत्या खर्च करुन कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष द्या, अन्यथा कारवाईला सामोरे जा!, असा इशारा जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी यांनी ‘जिल्हा परिषद आपल्या दारी’ या उपक्रमांतून हिंगणघाट तालुक्यातील अधिकाऱ्यांना दिला.

ठळक मुद्देनितीन मडावी : हिंगणघाटला ‘जिल्हा परिषद आपल्या दारी’

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पंचायत राज व्यवस्थेमध्ये ग्रामपंचायत स्तरावर मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो. हा निधी योग्यरीत्या खर्च करुन कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष द्या, अन्यथा कारवाईला सामोरे जा!, असा इशारा जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी यांनी ‘जिल्हा परिषद आपल्या दारी’ या उपक्रमांतून हिंगणघाट तालुक्यातील अधिकाऱ्यांना दिला.‘जिल्हा परिषद आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत हिंगणघाट येथील पंचायत समितीमध्ये बैठक घेण्यात आली. यावेळी शासनाच्या विविध योजनांची तपशीलवार माहिती देऊन योजनानिहाय कार्यवाहीचा आढावा घेतला. जिल्हा परिषद ही ग्रामीण विकासाला चालना देणारी पंचायतराज संस्था असल्याने ग्रामीण व्यक्ती केंद्रस्थानी ठेऊन कामकाज करावे, अशा सूचना जि.प.अध्यक्ष मडावी यांनी दिल्या. तर मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाणे यांनी योजना राबविता पंचायत समिती, बांधकाम, लघूसिंचन, आरोग्य विभागाचे तालुकास्तरीय अधिकाºयांनी कोणत्याही प्रकारची हयगय न करता कामाची दक्षता बाळगण्याचे निर्देश दिले. या बैठकीला जिल्हा परिषदच्या उपाध्यक्ष कांचन नांदुरकर, महिला व बालकल्याण सभापती सोनाली कलोडे, शिक्षण व आरोग्य सभापती जयश्री गफाट, समाज कल्याण सभापती निती गजाम, हिंगणघाट पंचायत समितीचे सभापती गंगाधर कोल्हे, उपसभापती डॉ.विजय पर्बत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. करुणा जुईकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक इलमे, विपूल जाधव,जि.प.सदस्य माधव चंदनखेडे, शरद सहारे, धनराज तेलंग, जोत्स्ना सरोदे,मिलींद कोपुलवार, विभा ढगे तसेच जिल्हा परिषदेतील विभागप्रमुख व पंचायत समितीचे सर्व सदस्य, सरपंच, ग्रामविकास अधिकारी, शाखा अभियंता, विस्तार अधिकारी तसेच शासकीय खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :zpजिल्हा परिषद