शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

कारंजात महामार्गावर उड्डाणपूल होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 00:23 IST

जिल्हयातील राष्ट्रीय महामार्ग ६ वर दुतर्फा मोठया प्रमाणात नागरी वस्ती असलेल्या कारंजा घाडगे शहराकरिता उड्डाणपूल निर्मिती कार्याला गती द्यावी व अनेक दिवसापासून प्रलंबीत असलेल्या असलेला विषय सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेकरिता प्राधान्याने सोडवावा .......

ठळक मुद्देनितीन गडकरींशी खासदार रामदास तडस यांची चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हयातील राष्ट्रीय महामार्ग ६ वर दुतर्फा मोठया प्रमाणात नागरी वस्ती असलेल्या कारंजा घाडगे शहराकरिता उड्डाणपूल निर्मिती कार्याला गती द्यावी व अनेक दिवसापासून प्रलंबीत असलेल्या असलेला विषय सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेकरिता प्राधान्याने सोडवावा अशी विनंती खासदार रामदास तडस यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन लेखी निवेदनातून केली. खासदार रामदास तडस यांनी ना.नितीन गडकरी यांना सांगितले की, कारंजा घाडगे हे तहसील मुख्यालयाचे नगरपंचायत असलेले महत्वाचे शहर आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ च्या दोन्ही बाजूला नागरी वस्ती आहे. शाळा, दवाखाना, न्यायालय, बसस्टँड, बाजारपेठ, सरकारी कार्यालय, पोलीस स्टेशन, महाविद्यालय अश्या महत्वाच्या ठिकाणी नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन महामार्ग ओलांडांवा लागतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी उड्डाण पूल नसल्यामुळे अनेक भीषण अपघात देखील झालेले आहे. या सर्व बाबीचा गंभीरतेने विचार करुन २९ जून २०१६ रोजी कारंजा घाडगे येथे उडाणपुल निर्माण करण्याबाबत भारतीय राष्ट्रीय महामार्ग नागपूर कार्यालयाने सविस्तर प्रस्ताव दिल्ली मुख्यालयी पाठविला होता. या प्रलंबीत प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेऊन कारंजा घाडगे जनतेला न्याय मिळवून द्यावा अशी विनंती खासदार रामदास तडस यांनी केली. निर्माण होत असलेल्या बुट्टीबोरी-वर्धा-यवतमाळ महामार्ग निर्माण कार्य सर्व प्रमुख शहर केळझर, सेलू, वर्धा, सालोड, देवळी, व कळंब येथे बाह्यवळण रस्ते तयार करण्यात येत आहे. यामुळे सर्व जड वाहणे शहरातील बाहेरुण प्रवास करतील अशी रचना आहे. परंतु कॉग्रेंस शासनाच्या कार्यकाळात निर्माण करण्यात आलेल्या महामार्गामध्ये कुठल्याही प्रकारची सुरक्षेचे उपाय व सामान्य नागरिकांच्या मागणीची दखल घेतली गेली नव्हती असे ही खा. तडस यांनी त्यांना सांगितले.वर्धा लोकसभा मतदार संघातील जांब चौरस्ता, हिंगणघाट शहरातील नांदगांव चौरस्ता येथील उड्डाण कार्याला नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून मान्यता मिळालेली आहे.सदर कामे लवकरच प्रारंभ होणार आहे. अशी प्रतिक्रीया खासदार रामदास तडस यांनी दिली. केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या सुचनेनुसार कारंजा घाडगे उड्डाणपुलाकरिता लवकरच बैठकीचे आयोजन करुन हा प्रश्न देखील भारत सरकार नक्कीच मार्गी लावेल असा विश्वास खासदार रामदास तडस यांनी यावेळी व्यक्त केला.महिना भरात दोघांचे गेले जीवकारंजा धाडगे येथे महामार्ग ओलांडताना गेल्या महिना भरात दोन जणांना आपला जीव गमवावा लागला. मुलगा रूग्णालयात होता त्या जेवनाचा डबा देण्यासाठी जाणाऱ्या वडीलाला अपघात झाला व ते मरण पावले. तर कारंजा येथील एका हॉटेल मध्ये काम करणाऱ्या एका नोकराला महामार्गावर वाहनाची वाट पाहत असताना अपघात झाला यात त्यांचा मृत्यू झाला.तो परप्रांतीय युवक होता. याशिवाय अनेक किरकोळ अपघात येथे पुलाअभावी झाले आहेत.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीRamdas Tadasरामदास तडस