शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

आर्वी तालुक्यात पुराचा हाहाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 05:00 IST

बाकळी नदीचे पाणी नांदपूर आणि शिरपूर गावात शिरल्याने घरामध्येही पाणी साचले होते. नांदपुरातील १४ घरांमध्ये पाणी शिरल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. देऊरवाडा येथील वर्धा नदीच्या पुलावरून दोन फूट पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद करण्यात आली. निम्न वर्धा प्रकल्पाच्या बॅक वॉटरचा मोठ्या प्रमाणात फटका बसल्याने सुमारे तीनशे एकर शेती वर्धा नदीच्या पाण्याखाली आल्याने शेतात जाण्यास मार्गच राहिला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क देऊरवाडा/आर्वी : वर्धा नदी दुथडी भरून वाहत असल्याने या पूर परिस्थितीचा अनेक गावांना फटका बसला आहे. तालुक्यातील ३० ते ४० घरांची पडझड झाली असून अनेकांचा संसार उघड्यावर आला आहे. बुधवारी तालुक्यात ११४ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली असून, आतापर्यंत तालुक्यात ६९९.१९ मिमी पाऊस झाला आहे. वर्धा नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने गुरुवारी सकाळपासून आर्वी-अमरावती मार्ग बंद झाला आहे. दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या. बुधवारी रात्री तळेगाव (श्याम.पंत) ते आर्वी मार्ग हा वर्धमनेरी येथील पुलावरून पाणी असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. या पुरामध्ये चार बस अडकल्याने त्या बसमधील प्रवाशांची राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था वर्धमनेरी येथील आश्रमात करण्यात आली होती. गुरुवारी सकाळी साडेसात वाजता या बस तळेगाव, कारंजा व ढगा या मार्गाने काढण्याच्या सूचना देण्यात आल्या. बाकळी नदीचे पाणी नांदपूर आणि शिरपूर गावात शिरल्याने घरामध्येही पाणी साचले होते. नांदपुरातील १४ घरांमध्ये पाणी शिरल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. देऊरवाडा येथील वर्धा नदीच्या पुलावरून दोन फूट पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद करण्यात आली. निम्न वर्धा प्रकल्पाच्या बॅक वॉटरचा मोठ्या प्रमाणात फटका बसल्याने सुमारे तीनशे एकर शेती वर्धा नदीच्या पाण्याखाली आल्याने शेतात जाण्यास मार्गच राहिला नाही. तसेच या शेतातील पिकेही पाण्याखाली आल्याने धोका निर्माण झाला. आर्वी नगरपालिकेच्या हद्दीतील मायबाई वॉर्डातील दगडी पूल आणि अवघड वॉर्ड परिसरात मुख्याधिकारी आणि नगरपालिकेच्या पथकाने पाहणी केली. यावेळी सर्व घरे सुरक्षित होती; परंतु आजूबाजूच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या. श्रीराम शाळा व गुरुनानक धर्मशाळा या ठिकाणी तात्पुरती राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 

बाकळी नदीसह गावालगतच्या नाल्याला पूर आल्याने शिरपूर, जळगाव व नांदपूर या गावात पाणी शिरले. त्यामुळे बाधित होण्याची शक्यता असलेल्या लोकांना गावातील शाळेत स्थलांतरित करण्यात येत आहे. अप्पर वर्धा व निम्न वर्धा प्रकल्पातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गाबाबत प्रभावित होणाऱ्या गावातील सर्व सरपंच, पोलीस पाटील यांना अवगत करून गावातील शाळा उघडून देण्याबाबतच्या सूचना गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आल्या. तसेच या प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग लक्षात घेत गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.विद्यासागर चव्हाण, तहसीलदार आवी.  

टॅग्स :floodपूरRainपाऊस