वर्धा : भारताचा ६९ वा स्वातंत्र्यदिन जिल्ह्यात सर्वत्र शाळा-महाविद्यालय, ग्रामपंचायत, शासकीय व निमशासकीय कार्यालये यासह इतरही ठिकाणी साजरा करण्यात आला. सर्वत्र ध्वजारोहण करण्यात आले. तसेच शाळांमध्ये यावेळी वृक्षारोपण कार्यक्रमही घेण्यात आला. आयुर्विज्ञान विद्यापीठवर्धा : सावंगी येथील दत्ता मेघे आयुर्विज्ञान विद्यापीठात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. कुलगुरू दत्ता मेघे यांच्या उपस्थितीत दंतविज्ञान शाखेतील गुणवंत विद्यार्थिनी आरती मेहता हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. देशपांडे, माजी कुलगुरू डॉ. पटवर्धन, मुख्य समन्वयक डॉ. एस. एस. पटेल, डॉ. संदीप श्रीवास्तव, डॉ. अशोक पखान, डॉ. श्याम भुतडा, प्राचार्य बी. डी. कुलकर्णी, प्राचार्य डॉ. सचिन उंटवाले, अभ्युदय मेघे, डॉ. ललित वाघमारे, डॉ. गोयल, डॉ. सुधीर बालिगा, डॉ. प्रीती देसाई, डॉ. राजेश झा, डॉ. आदित्य पटेल, प्राचार्य वैशाली ताकसांडे, प्राचार्य गोयल, व्ही. आर. मेघे, मनीषा मेघे आदी उपस्थित होते. संचालन देवेंद्र गुजरकर यश काशिकर, रोझी शेख यांनी केले. मूकबधिर विद्यालयवर्धा : मुक-बधिर विद्यालयात मनीष राजपाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अध्यक्षस्थानी लॉयन्स क्लबचे उपाध्यक्ष नौशाद बक्श तर प्रमुख अतिथी म्हणून क्लबचे कार्याध्यक्ष अभिजीत श्रावणे, शाळा प्रमुख जी. एम. ढोले, उत्तम पावडे उपस्थित होते. कार्यक्रमानंतर विक्की पहूणा, अंकिता डहाके, पवन कांबळे यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वितरण केले. प्रास्ताविक जी.एम. ढोले संचालन विजय चोपडे यांनी केले. आभार के. बी. काकपुरे यांनी मानले.लायन्स क्लब गांधी सिटीवर्धा : लॉयन्स गांधी सिटीच्या वतीने महर्षि विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांसोबत स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला यावेळी रमनलाल लालवाणी व प्राचार्य उमेशसिंग सेंगर यांच्याद्वारे ध्वजरोहण करण्यात आले. यावेळी अरूण लेलेम लॉयन्स क्लब सचिव लॉ. अख्तर कुरेशी, कोषाध्यक्ष विद्या नरेडी, श्रीराम शर्मा, इमरान राही, अनिल नरेडी, मुस्तफा शौक, दिलीप ढोमणे, ज्ञानेश्वर पहाडे, प्रवीण धाकटे, आदर्श उमरे, प्रशांत सराफ, सु. दे. गणराज, शिला ढोबळे, विनायक साबळे, शिक्षक गण दिलीप खोडे, प्राजक्ता नाखले, जयश्री निखार, अर्चना तेलंग, श्वेता नेहारे, सोनम पाराशर, वनिता पारधे, वर्षा परशुराम उपस्थित होते. मातोश्री कनिष्ठ महाविद्यालय वर्धा : मातोश्री कनिष्ठ महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य उगले तर प्रमुख पाहुणे म्हणून अरुण बोरकुटे, संस्थेचे अध्यक्ष सुनील गायकवाड, संस्थेचे सचिव प्रमोद चौधरीम उपस्थित होते. संचालन किरण पाटील, आभार प्रियंका इमाने यांनी मानले. रोहणा येथे ध्वजारोहण कार्यक्रमरोहणा : येथे ६९ वा स्वातंत्र्य दिन सर्वत्र उत्साहात संपन्न झाला. यावेळी शेती तंत्र विद्यालयात प्राचार्य बाबाराव वाघ, धैर्यशिल वाघ स्मृति जनता कापूस प्रक्रिया सह. संस्थेत संस्थाध्यक्ष शिरीष वाघ, विघुत वितरण कंपनीत अभियंता दातीर, प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. ढोरे, पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉ. पाटील, मॉडेल हायस्कूलमध्ये प्राचार्य ए. एल. देशमुख, कोआॅपरेटिव्ह बँकेत व्यवस्थापक कुडे, सेवा सहकारी संस्थेत प्रशासक डोंगरे, पोलीस चौकीत ए. एस. आय. दुधकोहळे, मुलींच्या वसतीगृहात माधुरी मिटकरी, जि. प. मुलींच्या शाळेत मुख्याध्यापक स्मिता मैत्रे, मुलांच्या शाळेत मुख्याध्यापक उईके, उर्दू प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक निलोफर, ज्ञानदीप शाळेत जि.प. सदस्य हितेंद्र बोबडे, धैर्यशीलराव वाघ विद्यालयात संस्था सचिव शिरीष वाघ, ग्रा. पं. कार्यालयात सरपंच सुनील वाघ, कोल्हटकर कला महाविद्यालयात संस्था सचिव प्रकाश टाकले व के. जी. वाघ कॉन्व्हेंट तथा कनिष्ठ महाविद्यालयात सरपंच सुनील वाघ यांनी ध्वजारोहण केले. पं. स. सदस्य वैभव जगताप, उपसरपंच शेख अब्बास शेख जमाल, व गावातील गणमान्य व्यक्ती उपस्थित होते. ग्रामपंचायत येथे ध्वजारोहणसालोड : स्वातंत्र्य दिनी स्थानिक ग्रामपंचायत प्रांगणामध्ये सरपंच गीता झाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. नेहरू विद्यालयाचे क्रीडा शिक्षक चरडे यांनी सरपंचांना मानवदंना दिली गावकरी मोठ्या संख्येने उपिस्थत होते. भारसवाडा येथे कार्यक्रमभारसवाडा : येथे विविध ठिकाणी स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. मॉडेल हायस्कूल भारसवाडा येथे मुख्याध्यापक डोंगरे यांच्या हस्ते, प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक रामेश्वर, ग्रामपंचायत येथे सरपंच रेखा लोखंडे, सरकारी दवाखाण्यात वाघ, पशुवैद्यकीय दवाखाण्यात डॉ. थोटे, सार्वजनिक वाचनालय येथे सेवा निवृत्त शिक्षक कावळे, सार्वजनिक चौकातील ध्वजारोहण सरपंच लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले. इंदिरा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयवर्धा : येथे आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मनोहर बारस्कर तर प्रमुख अतिथी म्हणून जि. प. सदस्य किशोर चौधरी, सरपंच महेश देवढे, परिवहन समिती सदस्य सचिन मोहर्ले, पालक शिक्षक संघाचे सदस्य विठ्ठल चौधरी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, नागरिक, शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. बँड पथकाद्वारे प्रभात फेरी काढण्यात आली. संचालन आचल देवढे हिने तर आभार अपर्णा सोनकुसरे यांनी मानले. विठ्ठल पाटील, दीपक कदम, रंजना बोधाने, साधना कोल्हे, राजेश हरणे, भय्या डफ, पांडूरंग थुटे, कमलेश पगारे, अशोक वावरे, शीला वरभे, नरेंद्र गलांडे, अतुल सोनटक्के, सुधीर कांबळे, रामकृष्ण कामडी, मधुकर मोहिजे आदींनी सहकार्य केले.मॉडेल हायस्कूलवर्धा : मॉडेल हायस्कूल शिवनगर येथे मुख्याध्यापक विजय मुळे यांच्या हस्ते ध्वजरोहण करण्यात आले. अध्यक्षस्थानी विजय मुळे तर प्रमुख अतिथी म्हणून मुढाळ, विद्याते, उषा चौधरी उपस्थित होत्या. संचालन अरुण हुड यांनी केले तर आभार भाग्यश्री द्रव्यकार यांनी मानले. कार्यक्रमाला तुरक, गोडाणे, काशीनाथ बोंडसे, पजई, कंटाळे उपस्थित होते. यावेळी येथे वृक्षारोपण कार्यक्रमही घेण्यात आला.प्रहार इंग्लिश मीडियम स्कूलवर्धा : स्थानिक प्रहार इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रांगणात ६९ वा स्वातंत्र्यदिन संपन्न झाला. यावेळी प्रहारच्या बालछात्र सैनिकांनी ध्वजारोहण केले. यानंतर नालवाडी परिसरातून प्रभातफेरी काढण्यात आली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघाचे नामदेव गुजरकर तर अतिथी म्हणून राजेश्वर कोंबे, डॉ. इंदू कुकडकर, प्रभारी मुख्याध्यापक वैशाली गुजरकर उपस्थित होते. संचालन अध्यापिका पूजा घुटके यांनी तर आभार अध्यापिका शिल्पा गजभिये यांनी मानले. यशस्वीतेकरिता जयश्री हाडके, मनीषा खोपे, सोनल जयस्वाल, वृषाली गुजरकर व सरोज नागोसे यांनी सहकार्य केले. कस्तुरबा पब्लिक स्कूल वर्धा : कस्तुरबा पब्लिक स्कूल रोठा येथे ध्वजारोहण कार्यक्रम पांडूरंग बोभाटे यांचे हस्ते मुख्याध्यापक मिलिंद सालोडकर आणि चिंतामण शेंडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. कार्यक्रमाला संस्थेच्या अध्यक्ष हेमलता मेघे, प्रा. अनंत मेघे, माध्यमिक विद्यालय तसेच कस्तुरबा ज्युनिअर कॉलेजचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. रिना पानबुडे, शबाना खान, स्वाती बक्कल, शुभम मुंगसे आदींनी यावेळी सहकार्य केले. माध्यमिक विद्यालय रोठा वर्धा : रोठा येथील माध्यमिक विद्यालय येथे स्वातंत्रदिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाला संस्थेचे कार्यवाहक प्रा. अनंत मेघे, पांडूरंग बोभाटे, चिंंतामण शेंडे, मुख्याध्यापक मिलिंद सालोडकर, माजी सरपंच सुनंदा खैरकार, कांता डेहनकर उपस्थित होते. कार्यक्रमाला याप्रसंगी विनोद वाघ, वैशाली मुरले, सरोज गांजरे, वर्षा खंडागळे, अविनाश पाटोळे, रवींद्र धोंगडे, शुभम मुंगसे आदी उपस्थित होते. खरांगणा परिसरात ध्वजारोहण कार्यक्रमखरांगणा : परिसरात सर्व शासकीय कार्यालये, शाळा महाविद्यालये व हुतात्मा स्मारकात ध्वजारोहण करण्यात आले. खरांगणा, मोरांगणा येथे शाळेच्या ध्वजारोहणानंतर गांधी चौकात सरपंच, उपसरपंच यांनी ध्वजारोहण केले. पोलीस स्टेशन खरांगणा येथे ठाणेदार पांडे यांनी, मोरांगणा केंद्र शाळेत केंद्रप्रमुख संजय ढोक यांनी ध्वजारोहण केले. या प्रसंगी आजी माजी सरपंच, ग्राम शिक्षण समिती अध्यक्ष, सदस्यगण सर्व अंगणवाडी सेविका व नागरिकांची उपस्थिती होती. मोरांगणा शाळा वृक्षारोपणखरांगणा : जिल्हा परिषद केंद्र शाळा मोरांगणा येथे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वनविभागाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी आर्वी विधान सभा क्षेत्राचे आमदार अमर काळे यांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाला वनपरिक्षेत्र अधिकारी जी. पी. बोबडे, वनपरिक्षेत्र सहायक विलास मडवे, बिट गार्ड वृषाली मरतोडे, शिक्षण समिती अध्यक्ष किशोर राजूरकर, माजी अध्यक्ष बाबाराव मांढरे, सरपंच विनायक कौरती, माजी सरपंच उमक, गौरव मोहोड, मिस्कीन पाटील, शैलेश मुंजेवार, शिक्षक देहारे, बोराडे, श्रीधर बोराडे यांच्यासह विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. मुख्याध्यापक कोठेकर यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी विद्यार्थी उपस्थित होते.विकास विद्यालयकोरा : येथे सर्वत्र स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक सुके, ग्रामपंचायतीत सरपंच अरुण चौधरी, बँक आॅफ महाराष्ट्र येथे शाखा व्यवस्थापक खेळकर यांनी तर विकास विद्यालयात प्राचार्य पुनवटकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात केले. कार्यक्रमाला ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. अल्लीपूर येथे ध्वजारोहण कार्यक्रमअल्लीपूर : येथे ठिकठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये एन.के.व्ही कॉन्व्हेंटमध्ये संस्थेचे सचिव गिरीश खरी यांच्या हस्ते ग्रा.प. सदस्य गोपाल मेघरे यांचे उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक सचिन भुते, शिक्षक नलिनी पुनासे, दर्शना ढगे व कर्मचारी उपस्थित होते. ग्रा. प. कार्यालय कार्यालयात सरपंच मंदा पारसडे यांच्या हस्ते उपसरपंच रामा धनवीज ग्रामविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. पोलीस स्टेशनमध्ये ठाणेदार भानुदास पिदुरकर यांनी ध्वजारोहण केले. इंदिरा गांधी विद्यालयात संस्थाध्यक्ष वामन खोडे यांनी ध्वजारोहण केले. यावेळी प्राचार्या अर्चना मुडे, सचिव योगेश खोडे, हिरामन घोडे, मारोती मुडे, डॉ. सुहास भलमे, डॉ. राजेंद्र वाघमारे, उपस्थित होते. जि. प. शाळेत मुख्याध्यापक भगत यांच्या हस्ते शिक्षक कलोडे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण केले. प्राथमिक आरोग्य केंद्रात जि.प.सदस्य नाना ढगे यांनी ध्वजारोहण केले. यावेळी प. स.सदस्या वंदना फटिंग, वैद्यकीय अधिकारी डॉ. मेश्राम, कर्मचारी, आशा वर्कर उपस्थित होते. विद्युत वितरण कंपनीत कनिष्ठ शाखा अभियंता जॉन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.एसएसएनजे महाविद्यालयदेवळी : येथील एस.एस.एन.जे. महाविद्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. सुरेश उपाध्याय, प्रा. मोहन गुजरकर, प्रा. धनंजय मुंगल उपस्थित होते. एनसीसी छात्रसैनिकांनी बँडपथकाद्वारे राष्ट्रीय सलामी दिली. याप्रसंगी उत्कृष्ठ छात्र सैनिक, रोव्हर्स व रेंजर्सना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देवून सन्मानित केले. तसेच सैन्य दलात सामील झालेले माजी एनसीसी छात्रसैनिक सुप्रभात बावनगडे, भुषण मुंजेवार व शैलेंद्र धुमाळे यांना सन्मानित करण्यात आले. पथसंचलन सिनिअर अंडर आॅफिसर अमोल कामडी यांच्या नेतृत्वात करण्यात आले. मुलांच्या पथकाचे नेतृत्व अंडर आॅफिसर रवी बकाले व वैभव भोयर यांनी तर मुलींच्या पथकाचे नेतृत्व सार्जेंट उमा मसराम व पूजा गिरडकर यांनी केले. रोव्हर स्काऊट पथकाचे नेतृत्व सहाय्यक रोव्हर लिडर हेंमत चौधरी तर रेंजर गाईड पथकाचे नेतृत्व करिश्मा वाघमारे हिने केले. राष्ट्रीय हरित सेना पथकाचे नेतृत्व आशिष परचाके व स्मिता सुरजूसे यांनी केले. संचालन सहाय्यक रेंजर लिडर अश्विनी घोडखांदे हिने केले तर आभार प्रा. प्रभाकर ढाले यांनी मानले. यशस्वीतेकरिता प्रा. कुपटकर, प्रा. अविष्कार कुनघटकर, दिनेश रामगडे, राहुल कांबळे व छात्र सैनिकांनी सहकार्य केले.पवनार येथे ध्वजारोहण कार्यक्रमपवनार : येथे ठिकठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. ग्रा.पं. आणि किलबिल शाळेत सरपंच अजय गांडोळे यांच्या हस्ते, गांधी चौकात अशोक भट, अंगणवाडीमध्ये श्रीकांत तोटे, प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक राऊत, लाजूरकर, बजाज बाल मंदिरात उपसरपंच जगदिश पेटकर, बांगडे विद्यालयात मुख्याध्यापक श्रीकांत बांगडे, एमएसईबी मध्ये कनिष्ठ अभियंता कोरे तर विविध कार्य. सेवा संस्थेत शेषराव भांडवलकर यांनी ध्वजारोहण केले. बांगडे विद्यालयाद्वारे बँड पथकावर गावात प्रभातफेरी काढण्यात आली. नागरिकांनी ध्वजारोहणासाठी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.कस्तुरबा ज्युनिअर कॉलेज रोठावर्धा : कस्तुरबा ज्युनिअर कॉलेज रोठा येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले तसेच वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाला संस्थेचे कार्यवाहक प्रा. अनंतराव मेघे, पांडूरंग बोभाटे, चिंंतामण शेंडे, मुख्याध्यापक मिलिंद सालोडकर, माजी सरपंच सुनंदा खैरकार, कांता डेहनकर यांच्यासह कॉलेज प्रभारी सूरज साळुंखे, अश्विनी शेंडे, उमेश राऊत उपस्थित होते. नवभारत अध्यापक विद्यालयवर्धा : नवभारत अध्यापक विद्यालय तसेच जगजीवनराम माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. प्राचार्य सुनील गावंडे यांनी ध्वजारोजण केले. मुख्याध्यापक सतीश कराळे, माजी मुख्याध्यापक मधुकर वानखेडे, दिलीप मून, रमेश निमसडकर आदी उपस्थित होते. संचालन भावेकर यांनी केले. कार्यक्रमाला प्रा. वारई, प्रा. राठोड, प्रा. मकेश्वर, प्रा. तिजारे, टेकाम, जाधव, जंगले, उईके, माटे, पाटील, खैरकार, चरडे, मून, मसराम, बाळसराफ, कोटनाके, धनराज, सोनवणे, राजू सोनवणे, राऊत तसेच विद्यार्थी उपस्थित होते. कारंजा(येथे) सर्वत्र ध्वजारोहणकारंजा(घा) : येथे स्वातंत्र्यदिनी ठिकठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. तहसील कार्यालयात तहसीलदार एस. एस. काशिद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी पंचायत समिती सभापती संगीता खोडे, माजी सभापती मोरेश्वर भांगे, सोम मुद्गल, राम मोटवानी, राजु खवशी, मेघराज चौधरी, प्रेम महिले, संजय मस्के, कृउबास कारंजाचे संचालक टिकाराम मस्के, पंचायत समिती उपसभापती शुभांगी पठाडे, पंचायत समिती सदस्या प्रमिला चौधरी आदी उपस्थित होते. तालुका कृषी अधिकारी कार्यालयात तालुका कृषी अधिकारी व्ही. बी. महंत, यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी धनविजय, लाकडे, कर्मचारी व परिसरातील शेतकरी उपस्थित होते. गुरूकुल कॉन्व्हेंट च्या आवारात मुख्याध्यापक पंकज निंभोरकर यांनी ध्वजारोहण केले. सनशाईन कॉन्व्हेंटमध्ये प्रेम महिले यांनी ध्वजारोहण केले. कार्यक्रमाला गजानन बाजारे, अनिल जयस्वाल, उपस्थित होते. तसेच राजीव गांधी कॉन्व्हेंटमध्ये संस्थापक अरुणा चाफले यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. याप्रसंगी मुख्याध्यापक धोटे, सुपरवायजर एस. एस. रानोटकर यासह सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.विविध ठिकाणी ध्वजारोहणमोझरी(शे.) : येथे विविध ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. ग्रामपंचायत भवनात सरपंच पुष्पा येडमे यांनी ध्वजारोहण केले. याप्रसंगी उपसरपंच शुभ्रबुद्ध कांबळे, ग्रा. प.सदस्य गजानन झाडे, सूर्यकांत ढुमणे, संदीप उपासे, ढुमणे, भोयर, मुन, वाघमारे, ग्रामसेवक जयेंद्र केवटे, तलाठी मुंजेवार, पशुचिकित्सक डॉ. महक, सहाय्यक मुडे, धनेश्वर कारंजकर, वसंत शास्त्रकार, आरोग्य सेविका, माणिक, दुर्गे, आॅपरेटर, आकाश वनकर, बोबडे, राजीव धोबे उपस्थित होते. विकास विद्यालयात मुख्याध्यापक केशट्टीवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्राथमिक केंद्र शाळेत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजीव धोबे यांनी ध्वजारोहण केले. याप्रसंगी मुख्याध्यापक करणाके, नेहारे, सहारे, फुळमाळी उपस्थित होते. येथील झेंडा चौकात सरपंच पुष्पा येडमे यांनी ध्वजारोहण केले. कार्यक्रमाला ग्रामस्थांनी सहकार्य केले. प्रहार स्कूलद्वारे अभिवादन कार्यक्रमवर्धा : समाज जागृती व सैनिकी शाळेच्या धर्तीवर प्रहार स्कूलच्या वतीने स्वातंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला भारत मातेचे पूजन कार्यक्रम राबविला. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गुंजन कार्यक्रमांतर्गत देशभक्ती जागविणारी अनेक गीते सादर केली. हातात तिरंगा झेंडा घेवून नागरिकांना देश प्रेमाचा संदेश दिला. यावेळी प्रहारचे अध्यक्ष मोहन गुजरकर, सचिव संदेश तुरक, कोषाध्यक्ष रविंद्र गुजरकर, पर्यवेक्षीका वैशाली गुजरकर व अनेकांची उपस्थिती होती.(लोकमत न्यूज नेटवर्क)
स्वातंत्र्यदिनी जिल्ह्यात ठिकठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रम
By admin | Updated: August 17, 2015 02:17 IST