शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

दोन तालुक्यांसह पाच गावे झाली जलमित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 01:05 IST

जलयुक्त शिवार अभियानाचा पुरस्कार वितरण सोहळा गुरुवारी वर्धेत राज्याचे जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला.

ठळक मुद्देजलसंधारण मंत्र्यांच्या हस्ते झाला गौरव

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जलयुक्त शिवार अभियानाचा पुरस्कार वितरण सोहळा गुरुवारी वर्धेत राज्याचे जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमात अहिल्याबाई होळकर जलमित्र प्रथम पुरस्कार सेलू तर द्वितीय पुरस्कार हिंगणघाट तालुक्याला देण्यात आला. याशिवाय गाव स्तरावरील पुरस्कारात वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्याचे मलकापूर प्रथम, सेलू तालुक्याच्या मदनीला द्वितीय, कारंजा तालुक्यातील मरकसूरला तृतीय तर हिंगणघाट तालुक्यातील उमरी (येंडे) व वर्धा तालुक्यातील तळेगावला अनुक्रमे चौथा व पाचवा पुरस्कार रोख ५० हजार रुपये देऊन सन्मानित केले.कार्यक्रमाला खासदार रामदास तडस, आमदार समीर कुणावार, आमदार आशिष देशमुख, जलसंधारण सचिव एकनाथ डवले, आयुक्त अनुपकुमार उपस्थित होते. याप्रसंगी विभागातील विविध जिल्ह्यातील गावांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आले. अधिकारी कर्मचाºयांना मिळणारा प्रथम पुरस्कार वर्धा जिल्ह्यातील रविंद्र तुकाराम तुपकर यांना प्रदान करण्यात आला.या वर्षात झालेली कामेविभागात सन २०१५-१६ मध्ये जलयुक्त शिवार अभियानात २०७७ गावांमध्ये २३ हजार ३७९ विविध जलसंधारणाची कामे पूर्ण झाली असून १५६ कामे प्रगतीपथावर आहे. लोक सहभाग व शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून तलाव व नाल्यामधून ७५.२३ लक्ष घट मीटर गाळ काढण्यात आला आहे. सन २०१५-१६ मध्ये सर्व गावे जल परिपूर्ण झालेली असून यातून १ लाख ९ हजार १०८ हेक्टर क्षेत्र सवंरक्षित सिंचनाखाली आले आहे.आज अखेर १९ हजार ७३२ कामे पूर्ण झाले असून ८४३ कामे प्रगतीपथावर आहे. ९१५ पैकी ७१२ गावे जल परिपूर्ण झाली असून यामुळे ४२ हजार ७१३ हेक्टर सरंक्षित सिंचनाखाली आले आहे. सन २०१७-१८ मध्ये ७५७ गावाची निवड करण्यात आली असून यामध्ये २१ हजार १२० काम प्रस्तावित केली आहे. यापैकी ९५५ कामे सुरू झाली असून शासनाकडून १४६ कोटी ६५ लक्ष रूपयाचा निधी प्राप्त झाला आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.