लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कृषी विभाग, जिल्हा परिषद, वर्धाच्यावतीने विविध भागात गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांमध्ये वाहनाव्दारे जनजागृती करण्यात येत आहे.जिल्ह्यातील आठही तालुक्यांतर्गत गावांमध्ये जिल्हा परिषद, वर्धा व विविध मान्यताप्राप्त बियाणे कंपन्या यांच्या संयुक्त सहकार्याने वाहनाव्दारे प्रचार व प्रसार करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. वर्धा, देवळी, हिंगणघाट, आर्वी, आष्टी, सेलू, कारंजा, समुद्रपूर तालुक्यातील गावांमध्ये हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.सोमवारी वर्धा जिल्हा परिषदेच्या प्रांगणातून पुन्हा पाच वाहनांना जि.प. अध्यक्ष नितीन मडावी यांनी झेंडी दाखवून या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. शेतकऱ्यांना देण्यात येणाºया मार्गदर्शनपर प्रपत्राचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हा परिषदचे अध्यक्ष नितीन मडावी, कृषी व पशुसंवर्धन सभापती मुकेश भिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाने, कृषी विकास अधिकारीे अश्विनी भोपळे, प्रदीप देशमुख, भगवान पाटील, अमोल पुंडलिक, जिल्हा जलसंधारण अधिकारी हेमंत गहलोद, जिल्हा आरोग्य अधिकारी अजय डवले, कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नितीन मडावी यांनी गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनांतर्गत वर्धा जिल्हा परिषद व विविध सिड्स कंपनी यांच्या प्रयत्नाने हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन या प्रसंगी केले. यावर्षीच्या हंगाममध्ये गुलाबी बोंडअळी,किडीचा प्रादुर्भाव होऊ नये तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी फवारणी करताना घ्यावयाची काळजी याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन व तांत्रिक बाबी संबंधी माहिती प्रचार वाहनाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाण (आठवडी बाजार, ग्रामपंचायत, चावडी) सदर जनजागृती वाहन शेतकऱ्यांना चित्रफीत दाखवून तसेच सापळे कसे लावायचे या विषयी मार्गदर्शन करणार असल्याचे कृषी अधिकाºयांनी या प्रसंगी सांगितले. त्यानंतर रथ ग्रामीण भागाकडे रवाना करण्यात आले.
पाच जनजागृती रथ शेतकऱ्यांना करणार मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 21:43 IST
कृषी विभाग, जिल्हा परिषद, वर्धाच्यावतीने विविध भागात गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनाबाबत शेतकºयांमध्ये वाहनाव्दारे जनजागृती करण्यात येत आहे.
पाच जनजागृती रथ शेतकऱ्यांना करणार मार्गदर्शन
ठळक मुद्देबोंडअळी व कीड व्यवस्थापन : जिल्हा परिषद अध्यक्षांनी दाखविली हिरवी झेंडी