लोकमत न्यूज नेटवर्ककोरा : येथील लाल नाला प्रकल्प १०० टक्के भरला आहे. जलाशयाचे पाचही दरवाजे ५ से.मी.ने. उघडण्यात आले आहे. त्यातून १६ पाण्याचा विसर्ग होत आहे. अशातच परिसरात १००४ मि.मि. पावसाची नोंद घेण्यात आल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.गेल्या एक महिण्यांपासून या परिसरात पावसाने जोर धरला आहे. शिवाय जलाशयही पूर्ण भरला असल्याने एक-दोन दिवसाआड प्रकल्पाचे दरवाजे खुले करावे लागत आहे. एक महिण्याआधीच प्रकल्पाने पाण्याची आपली सिमा ओलांडली. नदीकाठावरील शेतात पुराचे पाणी शिरले होते.तर काही गावांना पाण्याचा वेढा होता. यापूर्वी सदर प्रकल्पाचे पाणी इतक्या मोठ्या प्रमाणात सोडावे लागले नाही. पाणी सोडल्यामुळेही काही गावांना पुराचा धोका असतो. त्यामुळे मंगरूळ, कोरा, नारायणपूर, आसोला, डोंगरगाव, चिखली आदी नदीकाठावरील गावांना महिण्याभऱ्यापासून एक-दोन दिवसाआड सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. सध्या प्रकल्पातून पाणी सोडल्या जात असल्याने या गावांना पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कुठल्याही परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता पूर परिस्थिती ओढावल्यावर मदतीसाठी तालुका प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन तालुका प्रशासनाने केले आहे.
लाल नाला प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 06:00 IST
गेल्या एक महिण्यांपासून या परिसरात पावसाने जोर धरला आहे. शिवाय जलाशयही पूर्ण भरला असल्याने एक-दोन दिवसाआड प्रकल्पाचे दरवाजे खुले करावे लागत आहे. एक महिण्याआधीच प्रकल्पाने पाण्याची आपली सिमा ओलांडली. नदीकाठावरील शेतात पुराचे पाणी शिरले होते.
लाल नाला प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले
ठळक मुद्देजलाशय १०० टक्के भरला : नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा