शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

कारंजात आजी-माजी आमदारांचा कस

By admin | Updated: October 28, 2015 02:22 IST

कारंजा नगर पंचायतीची निवडणूक आता काहीच दिवसांवर येवून ठेपली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि भाजपाकडून जोरदार प्रचार युद्ध सुरू आहे.

नगर पंचायत निवडणूक : शिवसेना व अपक्षांमुळे नव्या समीकरणाचे संकेतअरुण फाळके कारंजा (घाडगे)कारंजा नगर पंचायतीची निवडणूक आता काहीच दिवसांवर येवून ठेपली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि भाजपाकडून जोरदार प्रचार युद्ध सुरू आहे. खर्डीपूरा पॅनल समर्थित भाजप परत सत्ता मिळविण्यासाठी तर बाजार पार्टी समर्थित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष सत्ता कायम राखण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे. आ. अमर काळे यांनी प्रचाराची धुरा आपल्या हातात घेतली असून ते येथे तळ ठोकून आहे. पक्षांंतर्गत नाराजी आणि उमेदवारी न मिळाल्याने हिरमोड झालेल्या कार्यकर्त्यांची मनधरणी त्यांच्याकडून सुरु आहे. तसेच ते ‘डोअर टु डोअर’ प्रचारावर अधिक भर देत असून ते विकासाचा अजेंडा मतदारांना पटवून देताना दिसून येत आहे. भाजपानेही प्रचारात आघाडी घेतली आहे. माजी आमदार दादाराव केचे यांच्या खांद्यावर प्रचाराची धुरा आहे. स्थानिक नेते, गटबाजी आणि रूसवे फुगवे विसरून कार्यकर्ते कामाला लागल्याचे चित्र आहे. उमेदवारी न मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचाही सूर आहे. तर काहींनी पक्षादेश झुगारुन बंडखोरीचा झेंडा हातात घेतला आहे. कारंजा ४ हजार ९३० पुरूष व ४ हजार ७१४ अशा एकूण ९ हजार ६४४ मतदारांवर उमेदवारांची भिस्त आहे. संपूर्ण शहरांचे विभाजन १७ प्रभागात झाले आहे. प्रत्येक प्रभागात सुमारे ५०० ते ५५० मतदार आहेत. सर्वाधिक मतदार वॉर्ड ब ७ (६९९ मतदार) व वॉर्ड ८ मध्ये (७०२ मतदार) आहेत. वॉर्ड लहान व मतदार संख्या कमी असल्यामुळे उमेदवारांना प्रचार करताना कस लागणार आहे. माजी सरपंच शिरीष भांगे, माजी सरपंच नितीन दर्यापूरकर, माजी सरपंच अरविंद चरडे, माजी उपसभापती प्रेम महिले, शिवसेना नेते संदीप टिपले, ज्येष्ठ कार्यकर्ते दिलीप पालीवाल या सर्वांना ही निवडणूक वाटते तितकी सोपी नसून यापूर्वी त्यांनी केलेल्या कामाचा हिशेब मतदारांना द्यावा लागणार आहे. गत ग्रामपंचायतमध्ये निवडून आलेले काही उमेदवार पुन्हा आपले राजकीय भवितव्य आजमावत आहेत. त्यांना फक्त सात महिन्यांचा सत्ता कालावधी उपभोगता आला. त्यांना या कालावधीत काही करता आले नाही. यामुळे त्यांच्याबद्दल मतदारांत सहानूभुती दिसून येत आहेत.भाजपा व काँग्रेसचे १७ उमेदवार तर शिवसेनेने १४ उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसने फक्त पाच उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. आप आणि माकपानेही उमेदवारी नोंदविली आहे. खरी लढत जरी काँग्रेस आणि भाजपात होणार असली तर शिवसेनेचे काही उमेदवार आणि अपक्ष उमेदवार वरील दोन्ही पक्षाचे राजकीय समीकरण बिघडवून विजयांची अनिश्चितता वाढवित आहे. विजय कुणाचा हे आज तरी सामने कठीण आहे.