शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

कुणालाही फोन केल्यास प्रथम ‘कोरोना’ची मिळेल माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 05:00 IST

इतकेच नव्हे तर कुठल्याही परिस्थितीत कोरोना प्रसार होऊ नये म्हणून आरोग्य विभागाकडून प्रभावी जनजागृती करण्यात येत आहे. सध्या कुणालाही फोन केल्यावर कोरोना व्हायरस पासून बचावासाठी प्रत्येक नागरिकाने काय करावे, याची माहिती देणारी सुमारे ३३ सेकंदाची ऑडिओ क्लिप नागरिकांना ऐकावयास मिळत आहे. त्यामुळे नागरिकांनीही दक्ष रहावे असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

ठळक मुद्देआरोग्य विभाग सज्ज : जिल्ह्यात होतेय प्रभावी जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : चीन पाठोपाठ आता भारतात कोरोनाचे संशयित रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागाकडून प्रत्येक जिल्हा प्रशासनाला दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशाच सूचना वर्धा जिल्हा प्रशासनाला आणि आरोग्य विभागाला प्राप्त झाल्या असून आरोग्य विभागही कोरोनासोबत दोन-दोन हात करण्यासाठी सज्ज झाला आहे.इतकेच नव्हे तर कुठल्याही परिस्थितीत कोरोना प्रसार होऊ नये म्हणून आरोग्य विभागाकडून प्रभावी जनजागृती करण्यात येत आहे. सध्या कुणालाही फोन केल्यावर कोरोना व्हायरस पासून बचावासाठी प्रत्येक नागरिकाने काय करावे, याची माहिती देणारी सुमारे ३३ सेकंदाची ऑडिओ क्लिप नागरिकांना ऐकावयास मिळत आहे. त्यामुळे नागरिकांनीही दक्ष रहावे असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.राज्यात अद्याप कोरोनाचा एकही संशयित रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र, दक्षतेसाठी आरोग्य विभागाने जागृती सुरू केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्धा येथील एक व्यक्ती साऊथ कोरीया येथून वर्ध्याला आला तसेच हिंगणघाट येथील एक युवक इरान येथील मसद शहरातून हिंगणघाट येथे आल्याने त्यांच्यावर आरोग्य विभाग पाळत ठेऊन आहे. त्यांच्यात कोरोना व्हायरसची लागण झाल्याची कुठलेही लक्षणे अद्याप आढळलेली नसल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. तर यापूर्वी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील १३ विद्यार्थ्यांना १४ दिवसांसाठी देखरेखीत ठेवण्यात आले होते.जिल्हा सामान्य रूग्णालयात स्वतंत्र विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे. विविध माध्यमातून कोरोनाबाबत घ्यावयाच्या दक्षतेचीही जनजागृती केली जात आहे. कोरोना व्हायरस हा जीवघेणा असल्याने त्याची लागण होण्यापूर्वी नागरिकांनी दक्षता म्हणून काय करावे याची माहिती आता कुणालाही फोन केल्यावर सदर आॅडिओ क्लीपच्या माध्यमातून दिली जात आहे.पोलीस दलातील अधिकाऱ्यांसह इतर प्रशासकीय अधिकारी, कर्मचाºयांसह सर्वसामान्य नागरिकांच्या मोबाईलवर ही डायलर टोन ऐकू येत आहे. त्यामुळे कोरोनापासून बचाव करण्यासाठी घ्यावयाच्या उपाययोजनांची जागृती होण्यास मदत होत आहे.आजनसरा, फरिदबाबा दर्ग्याच्या अध्यक्षांना सूचनाआजनसरा येथील भोजाजी महाराज मंदिर आणि गिरड येथील फरिदबाबा दर्गा येथे गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, तसेच याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावा. यात्रास्थळी, गर्दीच्या ठिकाणी कोरोना व्हायरसचा संसर्ग इतरांना होण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकारी यांनी आजनसरा देवस्थान मंदिर समितीचे अध्यक्ष तसेच गिरड येथील फरिदबाबा दर्ग्याचे अध्यक्ष यांना खबरदारी घेण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत.माजी राष्ट्रपतींचा दौरा रद्दमाजी राष्ट्रपती प्रतीभा पाटील या महिलादिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी रविवारी वर्ध्यात येणार होत्या. पण, अचानक त्यांचा दौरा रद्द करण्यात आला. कोरोनामुळे हा दौरा रद्द करण्यात आला असावा असा कयास बांधल्या जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना