लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : येथील नगरपंचायतीने स्वच्छतेकरिता जवळपास ५७ लाखांचे कंत्राट दिले असून स्वच्छता मोहिमही राबविण्यात आली. परिणामी समुद्रपूर नगरपंचायतीला जिल्ह्यातून स्वच्छतेबाबत प्रथम क्रमांक प्राप्त झाला. मात्र शहरातील गटारगंगा आणि मोकळया जागेवरील कचरा कायमच असल्याने पुरस्कारावर संशयाचे वलय निर्माण झाले आहे.नगरपंचायतच्या हद्दीतील साफसफाई, सार्वजनिक शौचालय, मोकळ्या भूखंडावरील कचरा व झुडूप तसेच सार्वजनिक विहिरी व नाल्यांमधील गाळ संकलित करुन तो कचरा डेपोपर्यंत पोहोचविण्याचा कंत्राट देण्यात आला आहे. वर्षाकाठी नगरपंचायत कंत्राटदाराला ५७ लाख रुपये मिळतात. पण, जिल्ह्यात प्रथम पुरस्कार प्राप्त नगरपंचायतीचे वास्तव काही वेगळेच दिसून येत आहे. शहरातील माजी सभापती डॉ. खुजे यांच्या निवासस्थानाजवळ कचरा साठलेला आहे तसेच बाबाराव राऊत यांच्या घरा मागील मोकळ्या भूखंडावरही कचरा व घाण साचलेले दिसून येते. गावातून जाणाऱ्या लेंडी नाल्याच्या संरक्षण भिंतीचे नुकताच लाखो रुपये खर्चून बांधकाम करण्यात आले. बांधकाम करताना योग्य उतार न काढल्यामुळे या नाल्यात ठिकठिकाणी पाणी व कचरा साचलेला आहे.हा कचरा कुजल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. या नाल्याच्या बाजुला नगरपंचायत कार्यालय, शाळांसह प्रतिष्ठीतांची निवासस्थाने असल्याने त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. स्मशानभूमीकडे जाणाºया रस्त्यावरही दुतर्फा प्लास्टीकचा कचरा साचला आहे. सर्वत्रच अस्वच्छतेने कळस गाठला असताना जिल्ह्यातून प्रथम क्रमांक कसा मिळतो? जिल्ह्यातील स्वच्छतेच्या प्रथम पुरस्काराबाबत कोणते निकष लावण्यात आले? कशाच्या आधारे हा क्रमांक देण्यात आला. असे अनेक प्रश्न आता नागरिकांकडून चर्चीले जात आहे. सध्या शहरात पुरस्काराची पोलखोल सुरु आहे.
स्वच्छतेचा प्रथम पुरस्कार; पण शहरातील अस्वच्छता कायमच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 22:05 IST
येथील नगरपंचायतीने स्वच्छतेकरिता जवळपास ५७ लाखांचे कंत्राट दिले असून स्वच्छता मोहिमही राबविण्यात आली. परिणामी समुद्रपूर नगरपंचायतीला जिल्ह्यातून स्वच्छतेबाबत प्रथम क्रमांक प्राप्त झाला.
स्वच्छतेचा प्रथम पुरस्कार; पण शहरातील अस्वच्छता कायमच
ठळक मुद्देनगर पंचायतीच्या कार्याचे वास्तव : ५७ लाखांचा होतोच खर्च