शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
2
मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
3
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
4
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
5
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
6
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
7
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
8
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
9
पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय?
10
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!
11
"ती भारताबाहेर गेली अन्...", दिग्दर्शकाने सांगितलं 'रेड २'मध्ये इलियानाला न घेतल्याचं कारण
12
नेहा पेंडसेच्या लेकींना पाहिलंत का?, फॅमिलीसोबत बालीत करतेय व्हॅकेशन एन्जॉय
13
रुपाली गांगुलीला सेटवर कुत्रा चावला? 'अनुपमा' फेम अभिनेत्रीचा राग अनावर, म्हणाली- "हात जोडून सांगते.."
14
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
15
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
16
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
17
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
18
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
19
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
20
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण

‘नो व्हेईकल डे’चा आज पहिला गुरुवार

By admin | Updated: December 24, 2015 02:38 IST

‘लोकमत’च्या पुढाकारातून ४६ सामाजिक संघटनांनी केलेल्या निर्धारानुसार वर्धेकर दर गुरुवारी ‘नो व्हेईकल डे’ पाळणार आहेत. गुरुवार (दि.२४) हा पहिला दिवस आहे.

४६ संघटनांसह वर्धेकर सज्ज : ‘लोकमत’ कार्यालयाजवळून सकाळी ८ वाजता शुभारंभवर्धा : ‘लोकमत’च्या पुढाकारातून ४६ सामाजिक संघटनांनी केलेल्या निर्धारानुसार वर्धेकर दर गुरुवारी ‘नो व्हेईकल डे’ पाळणार आहेत. गुरुवार (दि.२४) हा पहिला दिवस आहे. यासाठी विविध सामाजिक संघटनांसह वर्धेकर सज्ज झाले आहेत. सकाळी ८ वाजता ठाकरे मार्केट येथील लोकमत कार्यालयासमोरुन ‘नो व्हेईकल डे’ या दिवसाचा प्रारंभ करण्यात येणार आहे. येथून निघालेली मिरवणूक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ पोहचणार आहे. यानंतर या ठिकाणी दर गुरुवारी हा दिवस पाळण्याचा संकल्प करुन सहभागी प्रत्येकजण आपापले कर्तव्य असलेल्या ठिकाणी जाणार आहे.यावेळी खा. रामदास तडस, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मीणा, जिल्हा प्रशासनातर्फे निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, अपर पोलीस अधीक्षक स्मीता पाटील, न.प. मुख्याधिकारी वैशाली वाघमळे, वाहतुक नियंत्रक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रकात बहादुरे प्रामुख्याने उपस्थित राहतील. आम्ही वर्धेकर, वैद्यकीय जनजागृती मंच, युवा सोशल फोरम, वर्धा सोशल फोरम, बहार नेचर फाऊंडेशन, निसर्ग सेवा समिती, न्यू इंग्लिश हायस्कूल, अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती, वर्धा एमआयडीसी असोसिएशन, जनहित मंच, जे.बी.सायन्स कॉलेज, भारतीय माजी सैनिक संघ, विदर्भ साहित्य संघ, फुलोरा, प्रहार समाज जागृती संस्था, इंडियन मेडिकल असोसिएशन, किसान अधिकार अभियान, अध्ययन भारती, लायन्स क्लब, नवभारत अध्यापक विद्यालय, यशवंतराव दाते स्मृती संस्था, निमा, वर्धा डॉक्टर्स असोसिएशन, एच.एम.ए.आय., वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी संघ, कामगार संघटना संयुक्त कृती समिती, राज्य कर्मचारी संघटना व महसूल संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, स्वामी मुक्तानंद योग महाविद्यालय, रुद्रा ग्राफिक्स, संभाजी ब्रिगेड, क्रांती ज्योती बहुउद्देशीय संस्था, म.रा. कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ, भगतसिंग युथ स्पोर्ट असोसिएशन, कामगार कल्याण संघटना संयुक्त कृती समिती, लोकसेवा प्रतिष्ठाण, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, ग्रामपयोगी विज्ञान केंद्र, सक्षम जनहित मंच, मराठा सेवा संघ, विदर्भ राज्य आघाडी, विदर्भ तेली समाज महासंघ, अ.भा. म. फुले समता परिषद, राष्ट्रीय ओबीसी महासंघ, संत पैकाजी सेवा समाज या संघटनांनी हा दिवस पाळण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमात समस्त वर्धेकरांनी सहभागी व्हावे, तसेच दर गुरुवार हा ‘नो व्हेईकल डे’ पाळावा, असे आवाहन आम्ही वर्धेकरचे संजय इंगळे तिगावकर, हरीश इथापे, वैद्यकीय जनजागृती मंचचे डॉ. सचिन पावडे यांच्यासह सहभागी सामाजिक संघटनांनी केले आहे.(जिल्हा प्रतिनिधी) आपला पुढाकार इतरांसाठी प्रेरणादायक ठरू शकतो !पर्यावरणाचा बचाव, त्यातूनच प्रत्येकांचे आरोग्य सुदृढ राहावे, हा प्रमुख हेतू. दर गुरुवारी प्रत्येक वर्धेकरांनी पेट्रोल-डिझेलची वाहने चालविणे शक्यतो टाळावे.या दिवशी शक्यतो सायकल, पायी वा पब्लिक सेवेचा वापर करावा.असे केल्यास मोठ्याप्रमाणावर वायू, ध्वनी प्रदूषण टाळता येणे शक्य आहे. परिणामी आपल्यासह आपल्या कुटुंबाला तसेच पशुपक्ष्यांनाही मोकळा श्वास घेता येईल.आपली सुरुवात इतर शहर व जिल्ह्यांसाठी प्रेरणादायी.ही चळवळ इतरही जिल्ह्यात पोहचणार-आशुतोष सलील‘लोकमतची’ ही संकल्पना खूप छान आहे. ही चळवळ इतर जिल्ह्यातही सुरू होईल. सर्वांनी मिळून ही चळवळ अशीच सुरू ठेवायची आहे. मी सहकाऱ्यांसह या चळवळीत सक्रिय सहभागी आहे. - आशुतोष सलील, जिल्हाधिकारी.