शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

अग्नितांडव; पाच दुकानांची राखरांगोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2018 22:15 IST

शहरात लक्ष्मीपुजन आटोपून दीपोत्सवाचा धुमधडाका सुरु होता. अख्खं शहर या आनंदोत्सवात रममान झाले असताना अनाचक स्टेशन चौकातील मुख्य बाजारपेठेत हाह:कार माजला. एका पाठोपाठ पाच दुकानांना आगीने कवेत घेत नजीकच्या दोन घरांनाही झळ पोहचली.

ठळक मुद्देदीपोत्सवाच्या आनंदावर विरजन : दोन घरांना आगीची झळ; कोट्यवधीच्या नुकसानीचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : शहरात लक्ष्मीपुजन आटोपून दीपोत्सवाचा धुमधडाका सुरु होता. अख्खं शहर या आनंदोत्सवात रममान झाले असताना अनाचक स्टेशन चौकातील मुख्य बाजारपेठेत हाह:कार माजला. एका पाठोपाठ पाच दुकानांना आगीने कवेत घेत नजीकच्या दोन घरांनाही झळ पोहचली. आगीचे लोळ पाहून नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत बचावकार्य सुरु केले. बुधवारी रात्री ९.४० वाजता घडलेल्या या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी कोट्यवधीच्या नुकसानीचा अंदाज वर्तविला जात आहे.मुख्य बाजार चौकातील बोहरा समाजाच्या व्यापाऱ्यांची मोठी प्रतिष्ठाने असून यातील पाच हार्डवेअरला रात्री ९.४० वाजता अनाचक आग लागली. आगीमुळे शहरात पडलेला लख्ख प्रकाश पाहून सर्वत्र खळबळ उडाली होती. तब्बल तीनतास चाललेल्या या अग्नितांडवामध्ये पाचही दुकानाची राखरांगोळी झाली तर दोन घरांचेही नुकसान झाले आहे. या बाजारपेठेतील दुकानांमध्ये असलेले फटाके तसेच दुकानांमागील घरातील गॅस सिलिंडर व महिलांना सुरक्षीतपणे बाहेर काढण्यासाठी पोलिसांसह समाजसेवकांनी महत्वाची भूमिका बजावली. या भीषण आगीत सैफी हार्डवेअर्स हकीमी हार्डवेअर्स, सैफी मशनरीज, भामल ट्रेडर्स, मोईजुद्दीन फकु्रद्दीन या प्रतिष्ठांमधील साहित्य जळून राख झाले. आगीचे कारण अद्यापही कळू शकले नाही.तीन तासानंतर आगीवर नियंत्रणस्थानिक स्टेशन चौकातील मुख्य बाजारपेठेत बोहरा समाजातील व्यापाºयांच्या प्रतिष्ठानाला बुधवारी ९.४० वाजता अचानक आग लागली. आगीचे लोळ उठताना दिसताच नागरिकांनी दीपोत्सवाचा आनंद बाजुला ठेऊन आगीच्या दिशेने धाव घेतली. यावेळी पाच दुकाने आगीत धुमसत होती. तसेच या आगीने बोहरा गल्लीतील दोन घरांनाही लक्ष केले होते. पोलिसांसह, समाजसेवक व नागरिकांनी आपापल्यापरीने आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. पण, आगीने रौद्ररुप धारण केले होते. त्यामुळे पुलगाव कॅम्प, नगर परिषद वर्धा, नगर परिषद आर्वी व नगर परिषद चांदुर (रेल्वे) येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. सर्वांच्या परिश्रमांती तीन तासानंतर या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. पण, तोपर्यंत पाचही दुकानातील साहित्य जळून राख झाले होते.पोलिसांवर दगडफेकआगीने बोहरागल्लीतील दोन घरांना लक्ष केले होते. त्यामुळे जीवितहानी होवू नये म्हणून पोलिसांनी सर्व दुकानाच्या मागील बोहरागल्लीत धाव घेतली. त्यानंतर पोलीस रेल्वे स्टेशन चौकात आले. परंतु काही युवकांचा गैरसमज झाल्याने त्यांनी पोलिसावर दगडफेक करून गाडी उलटविण्याचा प्रयत्न केला. यात पोलिसांच्या वाहनाच्या काचा फुटल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :fireआग