शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

आगीची ४०० झाडांना झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 23:47 IST

हनुमान टेकडीवरील आॅक्सिजन पार्क परिसरात लागलेल्या आगीत जवळपास ४०० झाडांना झळ पोहोचली. रविवारी सकाळी ७ वाजता ही घटना उघडकीस आल्यानंतर वैद्यकीय जनजागृती मंचाच्या सदस्यांसह नागरिकांनी धाव घेत आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.

ठळक मुद्देहनुमान टेकडीवरील आॅक्सिजन पार्कमध्ये घडली घटना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : हनुमान टेकडीवरील आॅक्सिजन पार्क परिसरात लागलेल्या आगीत जवळपास ४०० झाडांना झळ पोहोचली. रविवारी सकाळी ७ वाजता ही घटना उघडकीस आल्यानंतर वैद्यकीय जनजागृती मंचाच्या सदस्यांसह नागरिकांनी धाव घेत आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. सतर्कतेमुळे कोणत्याही झाडांची हानी झाली नाही.ओसाड पडलेल्या हनुमान टेकडीवर वैद्यकीय जनजागृती मंचाच्या पुढाकाराने सर्व सामाजिक संघटनांनी एकत्र येत हिरवळ फुलविली. नुकताच ‘मियावाकी डेन्स फॉरेस्ट’ प्रकल्पही राबविण्यात आला आहे. सध्या या परिसरात १ हजार ५०० च्या वर वृक्षांची लागवड करून संवर्धन केले जात आहे. यासाठी रोज सकाळी आणि सायंकाळी वैद्यकीय जनजागृती मंचासह वर्धेकरही येथे श्रमदान करतात. हा परिसर आता ‘आॅक्सिजन पार्क’ म्हणून नावारूपास आला आहे. आज या परिसरालगतच्या हिंदी विश्वविद्यालयाकडील सुरक्षा भिंंतीकडून आग लागली होती. ही आग आॅक्सिजन पार्कपर्यंत येऊन पोहोचली. नेहमीप्रमाणे सकाळी टेकडीवर गेलेले अनंत बोबडे यांना ही आग दिसून आली. त्यांनी लगेच वैद्यकीय जनजागृती मंचाच्या सदस्यांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. लगेच सर्वांनी टेकडी गाठत पाण्याचा मारा करून आग विझविली. विशेषत: सर्व वृक्षांना पूर्वीपासूनच आळे केले असल्यामुळे आग वृक्षांपर्यंत पोहोचू शकली नाही. मात्र, ४०० झाडांना झळ पोहोचली आहे. या झाडातील आळ्यात पाणी साठविण्यात आले आहे. ही आग सिगारेटमुळे लागली असावी, असा अंदाज व्यक्त होत आहे. या परिसरात रात्रीच्या सुमारास मद्यपींचा वावर असल्याने त्यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. यापूर्वीही दोनवेळा आगीच्या घटना घडल्या आहे. वेळीच लक्ष दिले नाही, तर अनेक वर्षांच्या तसेच अनेकांच्या परिश्रमावर पाणी फेरले जाईल.

टॅग्स :fireआग