शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

आगीत घर जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 00:15 IST

येथील वॉर्ड क्रमांक पाच मधील दीपक वाघमारे यांचे घर सोमवारी रात्री जळून खाक झाले. यात त्यांच्या घरातील सर्वच जीवनावश्यक वस्तुंचा कोळसा झाला आहे.

ठळक मुद्देजीवितहानी नाही : एक लाखाच्यावर नुकसान

ऑनलाईन लोकमतसमुुद्रपूर : येथील वॉर्ड क्रमांक पाच मधील दीपक वाघमारे यांचे घर सोमवारी रात्री जळून खाक झाले. यात त्यांच्या घरातील सर्वच जीवनावश्यक वस्तुंचा कोळसा झाला आहे. यावेळी कुटुंबियांनी वेळीच सतर्कता बाळगल्याने जीवितहानी झाली नाही.या आगीत वाघमारे यांच्या घरातील सर्वच साहित्याचा कोळसा झाला. यात सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. सदर घर मालकाला शासनाच्यावतीने मदत देण्याची मागणी गावकºयांकडून करण्यात येत आहे.येथील वॉर्ड क्रमांक पाच मध्ये दीपक वाघमारे व विकास वाघमारे यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. घरालगतच एका झोपडीत त्यांचे कुटुंब वास्तव्यास आहे. सोमवारी दीपक स्वयंपाककरित असताना गॅसवर भात मांडून बाहेर पाणी आणण्यासाठी गेला. तेवढयात अचानक घरामध्ये आगीने भडका घेतल्याचे त्याला दिसले. घरामध्ये गॅस सिलिंडर असल्यामुळे कोणीच घरात प्रवेश केला नाही. आगीत घरातील गॅस सिलिंडर, शेती उपयोगी साहित्य, लोखंड कापण्याचे यंत्र, गादी, कपडे, धान्य, स्वयंपाकाचे भांडे, टिनपत्रे यासह १५ हजार रुपये रोख रक्कम, ताडपत्री आदी साहित्याचा कोळसा झाला.आग विझविण्यासाठी घरी पाणी उपलब्ध नसल्यामुळे सुभाष कातुलवार यांच्या विहिरीवरील मोटरपंप सुरू करून आग विझविण्यात आली. घरात कोणीच हजर नसल्यामुळे जीवितहानी टळली. दिपक व विकास दोघेही भाऊ मोल मजूरीचे काम करून उदरनिर्वाह करतात. आगीत सर्वच भस्मसात झाल्यामुळे अंगावरील कपड्याशिवाय त्यांचे जवळ काहीच शिल्लक नाही. तलाठी ढोक यांनी पंचनामा करून तहसील कार्यालयात तातडीने अहवाल सादर केला. उपनगराध्यक्ष रविंद्र झाडे, नगरसेवक आशिष अंड्रस्कर यांनी वाघमारे कुटूंबियांना भेट देवून सांत्वना केली व मदतीचे आश्वासन दिले.नारायणपूर येथेही आगीत घर खाकनारायणपूर - येथील सुभाष पुसदेकर यांच्या घराला मंगळवारी दुपारी अचानक आग लागली. यात घरातील कापूस, चणा, गहू आदी पिकासह सर्वच साहित्याची राख झाली. सदर घटनेचा पंचनामा नारायणपूर येथील तलाठी प्रमोद रंगारी यांनी केला असून शासनाने अजून कोणत्याही प्रकारची मदत केली नाही.

टॅग्स :fireआग