लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सेवाग्राम भागातील एमआयडीसी परिसरातील टी-३६ मधील गादामाला अचानक आग लागली. ही घटना सोमवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली असून या आगीत मोठ्या प्रमाणात गोदामात ठेवून असलेली सरकी जळाल्याचे सांगण्यात आले. हे गोदाम पवन सिंघानिया नामक व्यावसायिकाचे असल्याचे सांगण्यात आले.पवन सिंघानिया नामक व्यावसायिकाचा एमआयडीसी भागात संस्कार अॅग्रो नामक सरकीपासून तेल काढण्याचा उद्योग आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणात सरकी पोत्यांमध्ये भरून ती गोदामात ठेवली होती. याच गोदामात सोमवारी सायंकाळी उशीरा अचानक आग लागली. बघता-बघता आगीने गोदामातील सरकीला आपल्या कवेत घेत रौद्ररूप धारण केले होते. आग लागल्याचे लक्षात येताच घटनेची माहिती सेवाग्राम पोलिसांसह अग्निशमन दलाला देण्यात आली. माहिती मिळताच दोन अग्निशमन बंब तसेच सेवाग्राम पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय बोठे यांनी आपल्या चमूसह घटनास्थळ गाठले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर पाण्याचा मारा करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यांना परिसरातील नागरिकांनीही सहकार्य केले. या घटनेची नोंद सेवाग्राम पोलिसांनी घेतली असून वृत्त लिहिस्तोवर आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू होते.
गोदामातील सरकीला लागली आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 21:42 IST
सेवाग्राम भागातील एमआयडीसी परिसरातील टी-३६ मधील गादामाला अचानक आग लागली. ही घटना सोमवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली असून या आगीत मोठ्या प्रमाणात गोदामात ठेवून असलेली सरकी जळाल्याचे सांगण्यात आले. हे गोदाम पवन सिंघानिया नामक व्यावसायिकाचे असल्याचे सांगण्यात आले.
गोदामातील सरकीला लागली आग
ठळक मुद्देएमआयडीसी भागातील घटना : अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल