शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्यात माजी कुलपतीसह दोघांविरुद्ध एफआयआर; चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 11:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे माजी कुलपती विभूतिनारायण राय, यांच्यासहित दोन अधिकाऱ्यांच्या विरोधात दाखल एफआयआरनुसार तपास करण्याचा आदेश जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश अपूर्वा भसारकर यांनी दिला.ही बाब सहा वर्षापूर्वीची आहे. तत्कालीन शोधछात्र राजीवकुमार सुमन याने बनावट मायग्रेशन दाखल केल्याची तक्रार माजी कुलपती विभूतिनारायण राय, डेप्युटी ...

ठळक मुद्देमहात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे माजी कुलपती विभूतिनारायण राय, यांच्यासहित दोन अधिकाऱ्यांच्या विरोधात दाखल एफआयआरनुसार तपास करण्याचा आदेश जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश अपूर्वा भसारकर यांनी दिला.ही बाब सहा वर्षापूर्वीची आहे. तत्कालीन शोधछात्र राजीवकुमार सुमन याने बनावट मायग्रेशन दाखल केल्याची तक्रार माजी कुलपती विभूतिनारायण राय, डेप्युटी रजिस्टार कादरनवाज खान, प्रभारी कौशल किशोर त्रिपाठी यांनी पोलिसांत दाखल केली होती. पोलिसांनी या तक्रारीची दखल न घेतल्याने वर्धा न्यायालयाने या प्रकरणात एफआयआर दाखल करण्याचा आदेश दिला होता. पण यात काही तथ्य न मिळाल्याने पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. २०१२ मध्ये बनावट मायग्रेशन दाखल करण्याबाबत पोलिसात तीन तक्रारी दाखल झाल्या होत्या. दरम्यान राजीवकुमार सुमन यांना बडतर्फ केले गेले होते. याच दरम्यान राजीवकुमार सुमन यांनी कुलपतींच्या विरोधात क्लोजर रिपोर्टचा विरोध करीत अर्ज दिला होता. त्यावर झालेल्या सुनावणीत न्यायाधीश अपूर्वा भसारकर यांनी १३ जुलै रोजी आदेश पारित करून फारशी दखल न घेता तपास केल्याचा तसेच ज्या महाविद्यालयाचे बनावट प्रमाणपत्र त्याच महाविद्यालयात कोणी कसे दाखल करेल, अशी टिप्पणी केली आहे. न्यायालयाने या प्रकरणाची पुन्हा तपासणी करून तीन महिन्यांत चौकशी अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे.

टॅग्स :Mahatma Gandhi Hindi Vishwa Vidyalayaमहात्मा गांधी हिंदी विश्व विद्यालय