शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने मिराज, जेएफ-१७ सह ५ पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली; ऑपरेशन सिंदूरबाबत खुलासा
2
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
3
COVID 19 : हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोना परतला, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ
4
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना
5
नाशिक महापालिका निवडणूक: महायुतीत शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत, श्रीकांत शिंदे करणार दौरा
6
Gold Rates 16 May : काल स्वस्त झालं, आज सोनं महागलं; १२०० रुपयांपेक्षा अधिक तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
7
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
8
आमिरची विमानतळावर वाट बघत होती गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट, कारमध्ये येताच दोघांनी एकमेकांना...
9
'संपूर्ण देश, देशाचे सैन्य PM मोदींच्या चरणी नतमस्तक', मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
10
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
11
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
12
२ हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
13
साडेसहा महिन्यांच्या गर्भवती तिरंदाजाची कमाल; पोटात बाळाची हालचात तरी अचूक साधला नेम
14
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
15
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
16
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
17
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
18
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
19
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
20
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा

१० वर्षांपूर्वी दिले होते फिल्टर

By admin | Updated: March 26, 2016 02:04 IST

जिल्ह्यातील बऱ्याच अंगणवाड्यामध्ये पाण्याची व्यवस्था नाही. येथे येणाऱ्या चिमुकल्यांना घरूनच पाणी आणावे लागत आहे.

शुद्ध पाण्याअभावी चिमुकल्यांचे आरोग्य धोक्यातवर्धा : जिल्ह्यातील बऱ्याच अंगणवाड्यामध्ये पाण्याची व्यवस्था नाही. येथे येणाऱ्या चिमुकल्यांना घरूनच पाणी आणावे लागत आहे. १० वर्षांपूर्वी काही निवडक अंगणवाड्यांना वॉटर फिल्टर देण्यात आले होते; मात्र ते कुठल्या अंगणवाड्यांना वाटप केल्या गेले याची माहिती जि.प.च्या महिला व बालकल्याण विभागाकडे नाही. यामुळे हे फिल्टर खरच अंगणवाड्यांना की ते कागदावरच होते याचा शोध घेणे गरजेचे आहे. अंगणवाडीला पाणी पुरविण्याची जबादारी ग्रामपंचायतीकडे आहे. यावर ग्रामपंचायतीला १० टक्के निधी खर्च करावा लागतो. मात्र त्यांच्याकडून याकडे दुर्लक्ष केले जाते. जिल्ह्यातील १,२८१ अंगणवाडी असून १७६ मिनी अंगणवाडी आहे. १,२८१ पैकी ३८ अंगणवाडी भाडेतत्वावर आहेत. यातील काही अंगणवाडी जि.प. शाळेच्या इमारतीमध्ये भरवल्या जात आहेत. अंगणवाडी इमारतीचा प्रश्न असताना विद्यार्थ्यांना शुध्द पाणी मिळत नाही. यामुळे अंगणवाड्यांतील चिमुकल्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अंगणवाडीतील मुलांना पुरविण्यात येत असलेले पाणी शुद्ध करण्याकरिता गतवर्षीपासून ‘जीवन ड्रॉप’ आणण्यात येत आहे; मात्र त्या ड्रॉपवरही वैधता दिनांक नाही. यामुळे विद्यार्थ्यांना अशुद्ध पाणीच पिण्याकरिता देण्यात येत असल्याची चर्चा जोरात आहे. काही अंगणवाडीतील ग्राम पंचायतीने नळ दिले आहे. कुठे हातपंप तर काही ठिकाणी विहिरीचे पाणी आहे. यामुळे या समस्येकडे शासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.अंगणवाडीच्या ३८ इमारती भाडेतत्त्वावर अंगणवाडीच्या इमारतीचीही दुरवस्था झाली आहे. एकूण ३८ अंगणवाड्या अद्यापही भाडे तत्वावर सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. भाडेतत्त्वावर असलेल्या १५ अंगणवाड्यांचे काम तांत्रिक अडचणीमुळे अर्धवट रखडले आहे. अंगणवाडी बांधकाम निधी राज्य शासनामार्फत येत असून ग्राम पंचायतीला जमा होतो. यामुळे कामाला पाहिजे तशी गती मिळत नसल्याचे सांगण्यात येत आहे. परिणामी येथे सुविधांची आणवा असल्याचे दिसून येत आहे.