शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

अमित शाहविरुद्ध गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 23:54 IST

काळा पैशाला ब्रेक लागावा या हेतूने नोटबंदीचा निर्णय घेण्यात आल्याचे भाजपा पुढारी सांगत असले तरी खऱ्या अर्थाने नोटबंदीचा फायदा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनाच झाला आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष शाह यांनी नोटबंदीच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात काळा पैसे पांढरा केला.

ठळक मुद्देकाँग्रेस मागणी : प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वात पोलीस कचेरीवर मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : काळा पैशाला ब्रेक लागावा या हेतूने नोटबंदीचा निर्णय घेण्यात आल्याचे भाजपा पुढारी सांगत असले तरी खऱ्या अर्थाने नोटबंदीचा फायदा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनाच झाला आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष शाह यांनी नोटबंदीच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात काळा पैसे पांढरा केला. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसच्यावतीने गुरूवारी शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून करण्यात आली. मोर्चाचे नेतृत्त्व महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारुलता टोकस यांनी केले.नोटाबंदीच्या कालावधीत सर्वाधिक जुन्या नोटा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या बँकेत जमा करण्यात आल्या. नोटबंदीच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका व त्रास सर्वसामान्य नागरिकांनाच सहन करावा लागला; पण याच कालावधीत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत असलेले अमित शाह यांनी आपल्या बँकेत जुन्या नोटा मोठ्या प्रमाणात जमा करून घेतल्या. हा प्रकार कष्टकरी व सर्वसामान्यांच्या जखमांवर मिठ चोळणाराच आहे. त्यामुळे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शहर पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. मगन संग्रहालय भागातील सदभावना भवन येथून निघालेला मोर्चा दुपारी १.१५ वाजताच्या सुमारास शहर पोलीस स्टेशन येथे पोहोचला. यावेळी शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार चंद्रकांत मदने यांना निवेदन सादर करण्यात आले. मोर्चात महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा हेमलता मेघे, महेश तेलरांधे, काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष सुनील कोल्हे, माजी नगरसेवक डब्बु शर्मा, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष प्रतिक भोगे, गोविंद दैय्या, शुभम शेळके, विपीन राऊत, निनाद जगताप, विराज शिंदे, धनंजय दंधारे, अनिकेत कोटमकार, मयुर उईके, अनिकेत एकलारे, विपुल शेडमाके, हातमोडे आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :congressकाँग्रेसMorchaमोर्चा