शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

पशुगणनेत वर्धा जिल्हा राज्यात पाचव्या स्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 00:02 IST

प्रत्येक पाच वर्षांनी पशुगणना होणे क्रमप्राप्त असून रखडलेली २० वी पशुगणना पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न होत आहेत. या पशुगणना प्रक्रियेत वर्धा जिल्हा राज्यात पाचव्या स्थानी आहे. इतकेच नव्हे तर वर्धा जिल्ह्यात ६२.६१ टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे.

ठळक मुद्देमार्च अखेरपर्यंत करावा लागेल अहवाल सादर । टॅबद्वारे नोंद घेण्याचे ६२.६१ टक्के झाले काम

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : प्रत्येक पाच वर्षांनी पशुगणना होणे क्रमप्राप्त असून रखडलेली २० वी पशुगणना पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न होत आहेत. या पशुगणना प्रक्रियेत वर्धा जिल्हा राज्यात पाचव्या स्थानी आहे. इतकेच नव्हे तर वर्धा जिल्ह्यात ६२.६१ टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे.पशुगणना पूर्ण करण्याची अखेरची मुदत ३१ डिसेंबर होती. परंतु, विविध कारणांमुळे पशुगणनेचे काम पूर्ण न झाल्याने मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा नव्या जोमाने पशुगणनेच्या कामाला गती देण्यात आली. वर्धा जिल्ह्यातील पशुंची गणना करण्यासाठी ११४ टॅब, पॉवर बँक व सिम उपलब्ध करून देण्यात आले आहे.इतकेच नव्हे तर टॅबमध्ये असलेले पूर्वीचे २.० अ‍ॅप वर्जन प्रत्यक्ष काम करण्यासाठी त्रासदायक असल्याने ३.० हे वर्जन टाकून पशुच्या गणनेच्या कामाला गती देण्यात आली. वर्धा जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख ९ हजार ८४६ ठिकाणी भेटी देऊन टॅबद्वारे पशुची नोंद घेण्यात आली आहे. तर राज्यात प्रथम क्रमांवर गोंदिया, द्वितीय स्थानी अकोला, तृतीय स्थानी हिंगोली तर चतुर्थ स्थानी बुलढाणा जिल्हा असल्याचे सांगण्यात आले. सदर पशुगणना पूर्ण करून मार्च अखेरपर्यंत अहवाल सादर करावा लागणार आहे.मुंबई शेवटच्या स्थानी२० व्या पशुगणनेचे गोंदिया जिल्ह्याने ८७.८१ टक्के काम पूर्ण केले आहे. शिवाय हा जिल्हा सध्या प्रथम क्रमांकावर आहे. तर वर्धा जिल्ह्यात पशुच्या गणनेचे काम ग्रामीण भागात ७१.४२ तर शहरी भागात ४३.३७ टक्के झाले आहे. वर्धा जिल्ह्यात एकूण ६२.६१ टक्के काम झाल्याने वर्धा जिल्हा हा सध्या पशुगणनेच्या कामात राज्यात पाचव्या स्थानी आहे. तर २.३० टक्केच काम झाल्याने मुंबई शेवटून पहिल्या स्थानी असल्याचे सांगण्यात आले.